लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
मुंबई : छान गुलाबी
थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात तापमानात वाढ
होत असुन आता उन्हाळ्याच्या जळा बसू लागल्या आहेत. राज्यात अकोला जिल्ह्यात आज सर्वात जास्त तापमानाची
नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि
मध्य महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णता जाणवण्यास सुरुवात
झाली आहे. त्यामुळे यंदा मार्च ते मे या काळात दिवसा आणि रात्रीही उष्णता वाढणार
आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
अरबी
समुद्रात उष्ण वारे वाहत आहे. त्यामुळे आर्द्रतेत वाढ होत आहेत. यामुळे येत्या
काही दिवसात महाराष्ट्रातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात
नागपूर, अकोला, वर्धा, गोंदिया आणि यवतमाळ यासारख्या अनेक शहरात 38 ते 39० सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात 39० सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर अकोल्यात आज 39.5० सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हे विदर्भातील इतर
जिल्ह्यापेक्षा सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ चंद्रपुरात 39.4०
सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
उष्णता वाढीची कारणं ?
हवामान
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या आठवड्यात विदर्भातील
अनेक जिल्ह्यातील दिवसा तापमान हे सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत 4-6 डिग्री सेल्सिअसने अधिक असेल. तर काही ठिकाणी हे तापमान 40० सेल्सिअसपेक्षा जास्त असू शकतो. अरबी समुद्रात वाहणाऱ्या कोरडे
वाऱ्यांमुळे हवेतील आद्रेतेत वाढ झाली आहे. यामुळे विदर्भ, मराठवाडा
आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेचे प्रमाण वाढणार आहे. तसेच मार्च महिन्याच्या
दुसऱ्या आठवड्यातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मार्चचा दुसरा
आठवडा हा पहिल्या आठवड्यापेक्षा उष्ण असणार आहे.
विदर्भातील शहरात किती
तापमान?
·
o अकोला
– 39.5
o अमरावती
– 37.6
o बुलडाणा
37.0
o चंद्रपूर
– 39.4
o गडचिरोली
– 37.6
o गोंदिया
– 37.0
o नागपूर
– 37.7
o वर्धा
– 38.8
o वाशिम
– 38.6
o यवतमाळ
– 37.7
राज्यात हवामान?
उत्तर कोकण – उत्तर कोकणामध्ये हवामान कोरडं राहील.
दक्षिण कोकण आणि गोवा – या ठिकाणी हवामान कोरडं असून अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा बसत आहे. येत्या
आठवड्यातही असेच तापमान राहणार आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र – उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडं राहील.
दक्षिण मध्य महाराष्ट्र – हवामान कोरडं राहणार असून उष्णतेची वाढ
होण्याची शक्यता
मराठवाडा – उष्णतेचे प्रमाण वाढणार
पूर्व विदर्भ – उष्णतेचे प्रमाण वाढणार
पश्चिम विदर्भ –उष्णतेचे
प्रमाण वाढणार आहे.
राज्यात गरमी करणार हैराण
हवामान
खात्याच्या अंदाजानुसार, यंदा विशेषत: उत्तर पश्चिम भारत म्हणजेच पंजाब,
राजस्थान, दिल्ली, महाराष्ट्र,
हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या
ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्य भारतातील काही भाग म्हणजे
बिहार, बंगाल, झारखंड इथं अधिक राहील.
तर मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागातही हवामान गरम असू
शकतं.
0 टिप्पण्या