Ticker

6/Breaking/ticker-posts

आशा भोसले यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण'..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई- ख्यातनाम गायिका आशा भोसले  यांना २०२० या यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार  देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९९३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. आशा ताईंनी आतापर्यंत १६ हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. वडील दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. आशा ताई ९ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचं निधन झालं. यानंतर संपूर्ण कुटुंब पुण्याहून कोल्हापुर आणि त्यानंतर मुंबईत आलं. कुटुंबाच्या मदतीसाठी आशा आणि मोठी बहीण लता मंगेशकर यांनी सिनेमांत गाणं गायला सुरुवात केली.

आशाताई यांनी आजवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. प्रादेशिक भाषांवर असलेलं त्यांचं प्रेम वेळोवेळी रसिकांपर्यंत पोहोचलंच आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं होतं. तरुण गायकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. त्यातून युट्यूबचा विचार पुढे आल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार

५ मे २००८ रोजी पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.

२००० मध्ये भारतीय सिनेमातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

आशा भोसले यांनी सातवेळा फिल्मफेअर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे तर १८ वेळा त्यांना नामांकनही मिळालं आहे.

याशिवाय दोनवेळा आशाताईंना त्यांच्या गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

२०१५ च्या बीबीसीच्या १०० इन्स्पायरिंग वुमनमध्ये आशा भोसले यांचं नाव होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या