Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रभागातील नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील - सुरेखा कदम

 मेहेर कॉलनी स्टेशन रोड येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ

 


( 

(


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:- नगर शहरातील प्रत्येक प्रभागात चांगली कामे झाली पाहिजे, त्याचबरोबर शहरात मोठे प्रकल्प आले पाहिजे, त्या माध्यमातून शहराचा विकास होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व एक विकसित शहर निर्माण होईल. याच दृष्टीकोनातून आपण महापौर असतांना प्रयत्न केले. अनेक कामे झाली, अनेक मंजुरी मिळाली. त्यावेळी केलेली कामे आता दृष्टीपथात येऊ लागली आहे. आताही प्रभागातील विकास कामांबाबत जागरुक राहून नागरिकांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. अशीच विकास कामे यापुढील काळातही होत राहतील. नागरिकांनीही आपल्या भागातील कामांसाठी आग्रही राहिले पाहिजे, असे प्रतिपादन माजी महापौर सुरेखा कदम यांनी केले.

 प्रभाग क्र.12 मधील मेहेर कॉलनी स्टेशन रोड येथील ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ माजी महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक दत्ता कावरे, अनिल गुगळे, अभय गुगळे, आशिष मुथा, वसंत गांधी, पारस धोका, फिरोज दमानिया, रतन कोठारी, ओंकार पाचपुते, हर्षल गुगळे, अजय मुथा, सुर्यकांत धोका, कल्पना धोका, आशा गायकवाड, चंद्रकला धोका, अजय लुंकड, श्रद्धा गुगळे आदि उपस्थित होते.

 याप्रसंगी नगरसेवक दत्ता कावरे म्हणालेनागरिकांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच आपण प्राधान्य दिले आहेत. चार नगरसेवकांचा प्रभाग असल्याने सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रत्येक भागात कामे होत आहेत. नागरिकांना सोयी-सुविधा मिळाव्यात याकडे आपण कायम लक्ष देत आहोत. या माध्यमातून अनेक कामे मार्गी लागली आहेत, उर्वरित कामे पुढील काळातील असे सांगितले.

 यावेळी संभाजी कदम म्हणाले, नागरिकांची समस्या सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे प्रथम कर्तव्य आहे. त्याचबरोबर प्रभागाचा सर्वांगिण विकास कसा होईल, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुचनांचा आदर करुन त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. प्रभागातील नगरसेवक हे चांगले काम करत असल्याने हा प्रभाग नक्कीच आदर्श ठरेल, असा विश्‍वास व्यक्त केला. याप्रसंगी  अनिल गुगळे, वसंत गांधी आदिंनी मनोगत व्यक्त करतांना नगरसेवकांनी केलेल्या कामांचे कौतुक केले.  सुत्रसंचालन अभय गुगळे यांनी केले. पारस धोका यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या