Ticker

6/Breaking/ticker-posts

तुकाई उपसा सिंचन योजनेत आणखी ४ तलावांचा सामावेश

 ६०० हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली; आ.रोहित पवारांकडून मंत्रिमंडळाचे आभार



 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 कर्जत:- कर्जत तालुक्यातील २८ गावांसाठी जीवनदायिनी असलेल्या तुकाई उपसा सिंचन योजनेत आता ४ अतिरिक्त पाझर तलावांचा सामावेश करण्यात येणार असल्याने तुकाई उपसा सिंचन योजना पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी संजीवनी ठरणार आहे.

 मंत्रिमंडळाच्या 'मुख्यमंत्री जलसंवर्धन कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,जलसंपदामंत्री जयंत पाटील,जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्यात फेब्रुवारीत झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. आता या योजनेत मुळ मंजुर असलेल्या २० पाझर तलाव व ३ लघु पाटबंधारे तलावांमध्ये ४ वाढीव पाझर तलावांची मंजुरी देण्यात आली आहे. या तलावांमध्ये पाणी सोडून त्या नंतर या पाण्याचा सिंचन आणि पिण्यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या वाढीव ५ कोटी ७९  लाख ८७ हजार खर्चास मान्यता देण्यात आली.

 एखाद्या योजनेत लोकांचा फायदा होणार असेल तर त्या योजनेला अधिक ताकद देण्याचे काम आ.रोहित पवार हे करत आले आहेत. येत्या काळात कुकडी व सिनाच्या पाण्यापासुन जी गावे वंचित आहेत त्या गावांसाठी वेगळी योजना कशी राबवता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. कर्जत तालुक्यात कार्यान्वित असलेली तुकाई उपसा सिंचन ही योजना कुकडी डावा कालवा किमी १७३ येथून प्रस्तावित आहे. तुकाई उपसा सिंचन योजनेंतर्गत अवर्षण प्रवण क्षेत्रातील एकूण २० पाझर तलाव व ३ ल.घू.पाटबंधारे योजनांमध्ये पाणी सोडण्याचे व तलाव भरून देण्याचे व त्यानंतर या पाणी साठ्याचा पिण्यासाठी व सिंचनासाठी या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती मात्र या सिंचन योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा विचार करता या योजनेत आणखी वाढीव पाझर तलावांचा सामावेश व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते आ.रोहित पवार यांचे प्रयत्न सुरू होते.

 या योजनेसाठी मंजुर करण्यात आलेल्या एकुण मुळ २० पाझर तलाव व ३ लघु पाटबंधारे तलाव या पाटबंधारे योजनांमध्ये अतिरिक्त वाढीव ४ पाझर तलावांचा सामावेश झाल्याने आता या पाझर तलावांची संख्या २४ झाली आहे.या उपसा सिंचन योजनेंतर्गत तब्बल ५९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या