Ticker

6/Breaking/ticker-posts

खटला रद्द : ह . भ. प .निवृत्ती महाराज देशमुख यांना दिलासा ..!

 संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाललोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

संगमनेर : - पुत्र प्राप्ती वरून वादग्रस्त ठरलेले महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांना मंगळवारी कोर्टाकडून दिलासा मिळाला . 

महाराष्ट्रातील समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्यावर संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात पीसीएमटी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी खटला चालू होता दिवाणी न्यायालयाने त्यांना हजर राहण्याचे  व म्हणणे मांडण्याचे आदेश दिले होते . त्याप्रमाणे इंदूरीकर यांनी काल वकिलामार्फत सविस्तर म्हणणे दाखल करून न्यायालयात अर्ज दाखल केला ,त्यावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा देत त्यांचा अर्ज मंजूर केला आहे . त्यामुळे इंदुरीकर महाराज यांची कायद्याच्या कचाट्यातून सुटका झाली आहे .

अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये सी पी एन डी डी कायद्याचा भंग होत  नसल्याचे मत अतिरिक्त सत्र न्यायालयाने नोंदवत त्यांनी दाखल केलेला अर्ज न्यायालयाने मान्य करत  एका अर्थाने समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांची त्यांच्यावर झालेल्या आरोपातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे . 

प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या वतीने वकील के डी धुमाळ यांनी बाजू मांडली   तर या न्यायालयाने निकाल दिल्यानतर अखेर सत्याचाच विजय झाला असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे .

काय म्हणाले होते इंदरीकर

सम तिथीस स्त्री संग झाल्यास मुलगा तर विषम तिथोस झाल्यास मुलगी जन्माला येते . याशिवाय अशुभ तिथिस झाल्यास जन्मला येणारी संतती ही बेवडी, कुळाचा नाश करणारी असते असे म्हणाले होते , यावरून राज्यभर मोठा गदारोळ झाला होता .

अॅड . गवादे जाणार उच्च न्यायालयात

दरम्यान संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या  निर्णयाच्या विरोधात आपण उच्च न्यायालया मध्ये दाद मागणार असल्याची माहिती अनिसच्या कार्यकर्त्या  अॅड .रंजना गवांदे यांनी म्हटले आहे .  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या