Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी कासार गावच्या विकास कामासाठी निधी देणार -आमदार राजळे

 

जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबदल खरवंडी गावकऱ्याच्या वतीने सत्कार 

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 खरवंडी कासार:- पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांची अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल खरवंडी कासार ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

खरवंडी कासार गावच्या ग्रामपंचायत मध्ये ही सत्तातर होऊन गावच्या सरपंचपदी प्रदीप पाटील यांची निवड झाल्या नतंर प्रथमच खरवंडी ग्रामपंचायतचे निर्वाचित सदस्य मडंळ व ग्रामस्थानी आमदार राजळे यांची भेट घेऊन सत्तकार केला तसेच खरवंडी कासार गावामधील प्रलंबित प्रश्न, अडीअडचणी संदर्भात चर्चा करून विविध विकास कामांच्या संदर्भात निधी प्राप्त करून देण्याची  मागणी केली.

 यावेळी आमदार  मोनिका राजळे यांनी खरवंडी कासार गावाच्या विकासकामांसाठी निधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच प्रदिप पाटील, ग्रामपंचायत सदस्य युसुफ बागवान, दौलत सोनवणे,योगेश अंदुरे ,बाळासाहेब जगताप ,भाऊसाहेब सांगळे, सचिन ढोले यांच्यासह खरवंडी गावातील

 दिपक पाटील, बबन अंदुरे गुरुजीलक्ष्मण अंदुरे पाटील, लक्ष्मण जगताप, शंकर माताडे, माणिक अंदुरे, सुरेश अंदुरे, प्रकाश अंदुरे, किरण अंदुरेजनार्धन माताडे, पोपट माताडे ,बाबासाहेब अंदुरे ,विष्णू बोरुडे, गफार बागवान ,सुधीर कोळपकर, बाबासाहेब बोरुडे, सोमनाथ अंदुरे, संजय व्यवहारे ,मधुकर अंदुरे ,बबन बुगे चैतन्य पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या