Ticker

6/Breaking/ticker-posts

मजलेशहर शिवारात बिबट्याचा हल्ला , दोन शेळ्यां फस्त..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव :-शेवगाव तालुक्यातील दहिगावने परिसरात असलेल्या मजलेशहर येथे शनिवार रात्री बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्यांच्या नरडीचा घोट घेतला असून परिसरात पुन्हा हजेरी लावली आहे गेल्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये बक्तरपूर ,भायगाव ,मजलेशहर परिसरात धमाकुळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभाग असमर्थ ठरला होता .

 त्यानंतर ऊस तोडणी हंगाम सुरू झाल्यावर बिबट्या ने परिसरातून काढता पाय घेतला होता मात्र शनिवार 6 मार्च रोजी नागरिकांना मजलेशहर परिसरातील वडुले रोडवर बिबट्याचे दर्शन झाले व रात्री दादासाहेब गोविंद म्हसरूप यांच्या दोन शेळी वर हल्ला करून दोन्ही शेळ्यांच्या नरडीचा घोट घेतला या घटनेने परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून रान वस्तीला असणाऱ्या पशुधनास धोका निर्माण झाला आहे. तरी मजले शहर व परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून बिबट्यापासून पशुधन वाचवण्या बरोबर स्वसंरक्षण करावे असे आवाहन मजलेशहर सरपंच अशोक लोंढे यांनी केले आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या