Ticker

6/Breaking/ticker-posts

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कमलाताई आपटे यांना ‘ ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान पुरस्कार ’ प्रदान

 

अहमदनगर रोटरी क्लब व मानकन्हीयौ ट्रस्टचा उपक्रम

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


 

 

नगर जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व सामाजिक कार्यकर्त्या, अंध सेवा मंडळाच्या संस्थापिका श्रीमती कमलाताई आपटे या लवकरच ९७ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. त्यानिमित्त रोटरी क्लब अहमदनगर व मानकन्हीयौ ट्रस्टच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून त्यांना ऋषितुल्य व्यक्तिमत्व सन्मान पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. अंध बंधुंसाठी कमलाताई आपटे यांच्या संकल्पनेतून डॉ.प्रकाश कांकरिया यांच्या प्रयत्नातून रोटरीने एमआयडीसी येथे उभारलेल्य रोटरी निवारा या घरकुल वसाहतीत हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया, रोटरी क्लबचे सचिव पुरुषोत्तम जाधव, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र आपटे आदींसह रोटरी क्लबचे सदस्य, आपटे परीवार व अंध सेवा मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

          यावेळी कमलाताई आपटे यांनी सत्कारास उत्तर देतांना भावनाविश होत जुन्या घटना व आठवणींना थोडक्यात उजाळा दिला. त्या म्हणाला, नगरमध्ये कोणीही अंध बांधवांसाठी काम करत नव्हते. त्यावेळी डॉ. प्रकाश व डॉ.सुधा कांकरिया यांच्या मुळेच मी अंध बंधूभगिनींसाठीचे सेवाकार्य सुरु करू शकले. त्यातूनच हा अंध बंधावांसाठी रोटरी निवारा प्रकल्प उभा राहिला आहे. हे कार्य आजही चालू आहे. उत्तरोत्तर या कार्याची अजून प्रगती होवो व या ठिकाणी दुमजली इमारत उभी राहो या सदिच्छा देते. देवाने मला भरपूर शक्ती दिली आहे. त्यामुळे रोटरीच्या या कार्याला माझी जी मदत लागेल ते पूर्ण सहकार्य देण्यास मी तयार आहे. या कार्याला माझे भरपूर आशीर्वाद आहेत. जीवनात मी जे काही सामाजिक काम केले आहे ते सर्वांनी केलेल्या मदती मुळेच. आजच्या कार्यक्रमच्या माध्यमातून मी सर्वांचे आभार मनात आहे. आज हा माझा अलभ्य लाभ आहे. माझा एवढा मोठा अद्वितीय असा सन्मान होईल अशी मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. याचा मला सर्वात जास्त आनंद झाला आहे.

          पुरुषोत्तम जाधव म्हणाले, कमलाताई आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 20 वर्षापूर्वी उभा केलेला हा रोटरी निवारा आजही भक्कम स्थितीत उभा आहे. रोटरीच्या इतिहासात एक नवा आदर्श या प्रकल्पाने निर्माण केला आहे. याठिकाणी रोटरी क्लबच्या माध्यमातून नवनवीन सुविधा देत आहे. डॉ. दादासाहेब करंजुले म्हणाले, महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्या बरोबर काम केलेल्या कमलाताईंचे कार्य महान आहे. त्यांच्या संकल्पनेतून उभा राहिलेला हा रोटरी निवारा प्रकल्पासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

          प्रास्ताविकात डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या, आज ९७ वर्षाच्या झालेल्या कामलाताई आपटे यांनी देशाच्या स्वात्यंत्र्यासाठी व अंध बंधुंसाठी केलेल्या महान कार्याचा सन्मान होण्यासाठी अहमदनगर रोटरी क्लब व मानकन्हीयौ ट्रस्टच्या वतीने या ह्रुदयस्पर्शी कार्याक्रमचे आयोजन  केले आहे. रोटरी निवारा निर्माण होण्यात कालामाताईंचे फार मोठे योगदान आहे. यावेळी सविता काळेराष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या नगर शाखेचे अध्यक्ष संभाजी भोर आदींचे भाषणे झाली. डॉ. प्रकाश कांकरिया यांनी कमलाताई आपटेंच्या कार्याचे कौतुक करून आभार मानले. यावेळी रोटरीचे निलेश वैकर, प्रशांत बोगावत, माधव देशमुख, कौशिक कोठारी, महावीर मेहेर, प्रकाश भंडारे आदींसह रोटरी निवारा वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या