Ticker

6/Breaking/ticker-posts

पंकज जाधव यांना औषधनिर्माण शास्त्रामध्ये आयसीटी मुंबईची पीएचडी...!


(अहमदनगर बीड हद्दीवरील रहिवासी पंकज जाधव यांना आयसीटी मुंबई चे व्हाईस चान्सलर प्रो.पंडित सर यांच्या हस्ते पीएचडी पदवी प्रदान करताना(छाया - दादा भालेकर)

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर:-अहमदनगर बीड हद्दीवरील माजलगावचे रहिवासी व पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरचे जावई पंकज हनुमंतराव जाधव यांनी जिद्द,चिकाटी व मेहनतीने इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी या मुंबई मधील रसायन तंत्रज्ञान संस्थेत आपले नाव कोरले असून त्यांना नुकतीच पीएचडी प्रदान करण्यात आली.

त्यांचे बी फार्म नाशिक तर एम फार्म इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी या मुंबई मधील रसायन तंत्रज्ञान संस्थेत मध्ये केले आहे. ते सध्या बँगलोर येथील एमएनसी कंपनीत वैज्ञानीक म्गणून कार्यरत आहे.त्यांना पीएचडी ही पदवी प्रो.पंडित सर( व्हाईस चान्सलर आयसीटी मुंबई) यांच्या हस्ते मिळाली, तर मार्गदर्शन प्रो.प्रदिप वाविया यांचे मिळाले.

या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा नाभिक संघटनेचे नेते बाळासाहेब चव्हाण, प्राजक्ता जाधव,अलका चव्हाण,प्रतिक चव्हाण,दिपाली चव्हाण व प्रिशा जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या