Ticker

6/Breaking/ticker-posts

अर्थसंकल्पात ऊसतोडणी कामगार महामंडळासह भगवान गड, गहिनीनाथ गडासाठी तरतुद ..

 अॅड .प्रताप ढाकणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश

     

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

टाकळीमानुर : राज्यातील लाखो भाविकांचेे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवानगड व बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड या तीर्थ स्थळाच्या विकासासाठी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच निधीची तरतूद करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी केल्याने तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ऊस तोडणी कामगार कल्याण महामंडळासाठी प्रत्यक्ष निधी केल्याने या तीर्थ स्थळाचा विकास व ऊस तोडणी कामगारांच्या कल्याणासाठी   केदारेेश्वर सहकारी  साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी   स्वागत केले आहे .

एडवोकेट ढाकणे म्हणाले की विधानसभेत काल राज्यातील महा विकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी सादर केला कोराना स्थितीतही सर्व घटकांच्या विकासासाठी भरीव तरतूद केल्याने महाविकास आघाडी सरकारची जनसामान्यांची प्रतिमा काळजी घेऊन स्पष्ट झाली आहे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र भगवानगड श्री क्षेत्र श्री क्षेत्र गहिनीनाथ गड व श्री क्षेत्र नारायण गड याच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात पहिल्यांदाच निधीची तरतूद ची घोषणा करण्यात आली आहे सर्वसामान्य भाविक आतून समाधान व्यक्त केले जात आहे भगवान गडाच्या विकासासाठी अर्थसंकल्पातून निधीची तरतूद व्हावी ज्याने गड व परिसरातील विकासकामे करताना पैशाची व इतर बाबीची पुणे होणार नाही यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली होती त्या वेळी मुंडे यांनी भगवानगडाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचे आश्वासन आपणास दिले होते आणि त्यानुसार मंत्री मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विशेष पाठपुरावा करून या क्षेत्राच्या विकासासाठी निधीची मागणी पूर्ण केल्याने भगवान गाडा सह बीड जिल्ह्यातील गहीनाथ गड व नारायण गडाचा ही साठीही मुंडे यांनी पालकमंत्री म्हणून आग्रह धरला होता या सर्व मागण्या अर्थसंकल्पात मान्य करण्यात आल्याने या स्थळाच्या भरीव व विकास कामांना आता चालना मिळणार आहे

स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या ऊस तोडणी कामगार कल्याण महामंडळासह ई महा विकास आघाडी सरकारने निधीची तरतूद केली आहे राज्यातील साखर कारखानदारी व ज्या घटकांच्या योग्य पानावर सुरू आहे त्या ऊस तोडणी कामगारांना व त्यांच्या कुटुंबियांना मदतीसाठी हे महामंडळ काम करणार आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हे महामंडळ कागदावरच अस्तित्वात होते मात्र महामंडळाच्या अस्तित्व पासून त्यासाठी राज्य सरकारने एक रुपयाही त्यासाठी दिला नसल्याचे एकही कामगारांना त्याचा लाभ मिळाला नव्हता एवढेच नव्हे तर महामंडळाचे कार्यालय गुंडाळण्यात आले होते मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी या महामंडळ पुनर्जीवित करून त्यासाठी निधीची तरतूद करण्यासाठी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे प्रयत्नपूर्वक यशस्वी पाठपुरावा केला आणि त्यातूनच कालच्या अर्थसंकल्पामध्ये या महामंडळास पैशाची उपलब्ध होण्यासाठी राज्यातील प्रत्येक साखर कारखान्यांकडून ऊस गाळपाच्या प्रतिटन दहा रुपये रुपये महामंडळात देण्याचे आदेश काढले जेवढी रक्कम गाळप झालेल्या उसाच्या प्रति ताणातून जमा होईल तेवढे राज्य सरकार महामंडळात देणार असल्याने या महामंडळास आता खऱ्या अर्थाने निधीची अडचण भासणार नाही व त्यातूनच ऊस तोडणी कामगारांच्या कल्याणासाठी कामकाज होणार आहे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने हित डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे आणि ही दोन्ही उदाहरणे मानावी लागतील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या