Ticker

6/Breaking/ticker-posts

विविध मागण्यांसाठी वंचित आघाडीचं राज्यपालांना साकडं

 राज्यातील शिष्यवृत्ती, दलित अत्याचार, वाढीव विज बील व इतर समस्या संदर्भात वंचित प्रदेश युवा आघाडीच्या वतीने राज्यपालांना निवेदन .




लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई - अ.नगर : - राज्यातील शिष्यवृत्ती, दलित अत्याचार, वाढीव विज बील तसेच शेतकरी शेत मजूर व अन्य समस्या संदर्भात वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या युवा प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा ह्यांचे नेतृत्वाखाली व प्रदेश उपाध्यक्ष डॉ अरुण सावंत आणि युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे व युवा पदाधिकारी ह्यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये काल राज्यपालांची भेट घेऊन  निवेदन सादर करून त्यावर उपाय योजना करण्यासाठी राज्य सरकारला बाध्य करण्याची मागणी करण्यात आली.

 राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्या पासून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्यापैकी महाराष्ट्र सरकार कडून दिली जाणारी शिष्यवृत्ती व फेलोशिप २०१९ पासून ची प्रलंबित आहे, उलट सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर कामांसाठी वळवून एक प्रकारचा अन्याया केला, या संदर्भात सामाजिक न्याय विभागाचे मंत्र्यांना अनेक वेळा निवेदन देण्यात आले तरी सुद्धा कोणत्याही प्रकाराची कार्यवाही झाली नाही 
२) महाराष्ट्रात दलितांवर अनेक ठिकाणी गावगाड्यात जातीयवादी लोकांकडुन आन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, तरी गृह मंत्रालयातर्फे या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
 ३) महाराष्ट्र सरकारने 50 टक्के वीज बिल माफी ची घोषणा करून त्यात त्यांनी निर्णय घेतला नाही, उलट 100 टक्के बिल भरण्यासाठी चे आदेश देण्यात आले आहेत आणि सर्व महत्वाचे जे विज बील आकारण्यात आले आहे त्या गतवर्षी पेक्षा दुप्पट बील आकारण्यात आले, सामान्य माणसाला ही बाब त्रासदायक ठरत आहे.

उच्च शिक्षणाच्या संदर्भात कोरोना मुळे अनेक विद्यार्थी चा विद्यापीठ कडून उशिरा परिक्षा घेण्यात आल्या परंतु त्या मध्ये उच्च शिक्षण साठी पात्रत विद्यार्थी ना फेलोशिप साठी चे वयात ते बसू शकत नाही आणि U.G.C. कडून असे जाहीर करण्यात आले होते की त्यात सुधारणा केली जाणार आहे परंतु ना राज्यने ना U.G.C. ने अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

१९/ ११/२०१९ ला महामहीम राज्यपालांना शेतमजूरचा विद्यार्थी साठी आम्ही महामहीम राज्यपालांनाची भेट घेऊन अचुक मागणी केल्याने तो प्रश्न निकाली काढण्यात आला होता. २१/११/२०१९ ला त्या संदर्भात आदेश जारी केला होता त्यामुळे आम्हाला राज्य सरकार जरी न्याय देत नसेल तरी आमुचा विश्वास महामहीम राज्यपालांचा कार्यकुशलतेवर आहे, ते आमच्या संदर्भात सरकारला कार्यवाहीसाठी बाध्य करावी अशी प्रमुख मागण्या करण्यात आल्या.ह्यावेळी डॉ अरूण सावंत (माजी कुलगुरू तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), नीलेश विश्वकर्मा प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन युवक आघाडी,
 राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव, रविकांत राठोड,प्रदेश सदस्य,ऋषिकेश नांगरेपाटील, सदस्य,विशाल गवळी 
महाराष्ट्र राज्य सदस्य      
 वंचित बहुजन युवा आघाडी प्रामुख्याने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या