Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रेक्षकांची 'ही' आवडती मालिका लवकरच घेणार निरोप ..

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

 मुंबई :-'बाईको हवी अशी ' या नव्या मालिकेचा प्रोमो झळकला आणि त्याविषयी बोलायचं सोडून प्रेक्षक कोणती मालिका बंद होणार' यावरच चर्चा करू लागले आहेत.

नव्या मालिकेविषयी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या. त्यामध्ये 'जीव झाला येडा पिसा ही मालिका बंद करू नका' हे सांगणाऱ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर आहेत. पण प्रेक्षकहो तुमच्यासाठी एक बातमी; ती मालिका संपत नसून 'चंद्र आहे साक्षीला ' ही मालिका संपणार असल्याचं समजतं.

टीआरपीचं कारण देत ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती मिळते. ' बायको अशी हव्वी' या नव्या मालिकेची वेळ अद्याप सांगितली नसल्यामुळे नेमकी कोणती मालिका बंद होणार आहे हे अजून कळलेलं नाही. पण पुढच्या महिन्यात 'चंद्र आहे साक्षीला' ही मालिका संपणार असल्याचं समजतं. ही मालिका आता रंजक वळणावर आली असून त्यात पुढे काय होणार याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या