Ticker

6/Breaking/ticker-posts

भालगाव गट हरित करयाचा प्रयत्न - सौ. ढाकणे

 ढाकणवाडी येथे सौ .प्रभावती ढाकणे याच्यां हस्ते बंधाऱ्यासह रस्त्याचे भुमीपुजन 



ढाकणवाडी ता . पाथर्डी  येथे सौ .  प्रभावती ढाकणे याच्यां हस्ते बंधाऱ्याचे भुमीपुजन झाले यावेळी सरपंच सौ सुरेखा ढाकणे उपसरपंच सुनिल ढाकणे ( छाया - कृषणा अंदुरे )

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

खरवंडी कासार :राज्य शासनाच्या व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील भालगाव जिल्हा परिषद गटामध्ये जलसंधारणाचे कामे जास्तीत जास्त प्रमाणात करून दुष्काळी या भागासाठी जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणून हा भाग हरित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी केले

पाथर्डी तालुक्यातील ढाकणवाडी येथे बंधाऱ्याचे भुमी पुजन  व खैराड वस्ती रस्त्याचे मजबुती करण व डाबंरीकरणाचा प्रारंभ प्रसंगी  सौ . ढाकणे बोलत होत्या ढाकणवाडी येथे सुमारे 30 लाखाच्या विकास कामाचे उद्घाटन ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आले .

 या वेळी त्या पुढे बोलताना ढाकणे म्हणाल्या की . राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार असून जलसंधारणाच्या कामासाठी कृषी विभागामार्फत व पालक मंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहू . कायम दुष्काळी भागासाठी जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी काम करणार आहे .यावेळी सरपंच सुरेखा ढाकणे उपसरपंच सुनील ढाकणे महारुद्र कीर्तन मालेवाडी चे उपसरपंच सुनील खेडकर खरवंडीचे उपसरपंच  दिलीप पवळे , आंबादास राऊत ,बाबुराव ढाकणे उपस्थित होते .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या