Ticker

6/Breaking/ticker-posts

मनपा स्थायी समिती: सेना एकाकी .भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती ?

   


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 


अहमदनगर : भाजपाला दूर ठेवत राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस ' तुझ्या गळा..माझ्या गळा' करत आहे त. नगर शहराचे राजकारण मात्र, याला अपवाद ठरत आहे. शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या राजकारणात भाजपा - राष्ट्रवादी      महापौर पदाच्या निवडणूकीत एकत्र आल्याचा इतिहास ताजा आहे . आताही सेनेला एकाकी पाडून स्थायि समिती सभापती पदासाठी भाजपा राष्ट्रवादिला साथ देऊन परतफेड करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत .

मनपा स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीत शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा घाट घातला जात असून राष्ट्रवादीचाच सभापती करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सभापती पदासाठी नगरसेवक अविनाश घुले यांनी मंगळवारी सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान यावेळी भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांची असलेली उपस्थिती सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली आहे.

मनपाच्या स्थायी समिती सभापती पदासाठी कालपासून (मंगळवार) अर्ज दाखल करण्यास सु.रुवात झाली. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी आपला अर्ज उपायुक्त एस. बी. तडवी यांच्याकडे दाखल केला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक गणेश भोसले, संपत बारस्कर, प्रकाश भागानगरे, मुदस्सर शेख, मनोज दुलम, धनंजय जाधव, सचिन जाधव, संजय चोपडा, विनीत पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, निखिल वारे, सागर बोरुडे आदी उपस्थित होते..

 उद्या गुरवार (दि. ४) रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मनपात दुपारी निवड सभा होणार आहे.

स्थायी समितीत राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी ५ ,भाजपचे ४, तर काँग्रेस व बसपचे प्रत्येकी एक असे एकूण १६ सदस्य आहेत. मागील वेळी स्थायी समिती सभापती पदापासून शिवसेनेला दूर ठेवण्यात आले होते. ऐनवेळी भाजपचे मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सभापतिपद मिळविले होते.

राज्यपातळीवर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशी महाविकास आघाडी अस्तित्वात असताना नगरमध्ये मनपात मात्र शिवसेना व राष्ट्रवादीत वितुष्ट आहे. याचा फायदा भाजप घेत आला आहे. तिसऱ्या नंबरचा पक्ष असतानाही भाजपने महापौरपद मिळविले. राष्ट्रवादी,भाजपच्या युतीमुळेच शिवसेनेला सत्तेपासून दूर राहवे लागले आहे.

सभापतीपदासाठी भाजपकडून रवींद्र बारस्कर हे इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनीही अर्जही दाखल केला आहे. घुले किंवा बारस्कर यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ

 पडण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यावेळीही शिवसेनेला स्थायीत सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी व भाजपकडून खेळी खेळली जात असून त्याची प्रचिती काल राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना दिसून आली. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरताना भाजपचे महापौर वाकळे स्वतः उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादी-भाजपची ही युती पुन्हा एकदा शिवसेनेला स्थायी समिती सभापती पदापासून दूर ठेवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र गुरुवारीच यावर निर्णय होणार असल्याने दोन दिवसांत काय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या