Ticker

6/Breaking/ticker-posts

मंदिरांवर शासनाने अराजकीय व्यक्तींची विश्वस्तपदी नियुक्ती करावी – डॉ.कृषिराज टकले

 स्वाभिमानी मराठा महासंघाची पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पाथर्डी :-महाराष्ट्र हि संतांची भूमी म्हणून जगात प्रसिद्ध आहे. अनेक धार्मिक स्थळे मोठ्या प्रमाणात राज्यात आहे. मात्र या मंदिरांवर विश्वस्त मंडळावर राजकीय व्यक्तीची नियुक्ती केली जाते. धार्मिक देवस्थानांवर शासनाने अराजकीय व्यक्ती, निवृत्त न्यायाधीश किंवा निवृत्त उच्च दर्जाचे शासकीय अधिकारी यांच्या नियुक्त्या कराव्यात अशी मागणी पाथर्डी तालुक्यातील हञाळ येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे मेलद्वारे पञ पाठविलेल्या निवेदनात केली आहे.  

मंदिरांवर विश्वस्त मंडळावर राजकीय व्यक्तीची नियुक्ती केली जाते. त्यामुळे धार्मिक स्थळांमध्ये राजकीय पुढाऱ्यांचे हस्तक्षेप वाढून देवस्थानाचा विकास पाहिजे तशा पद्धतीने होताना दिसत नाही. देवस्थानांमध्ये धार्मिकता कमी आणि राजकारण जास्त अशी परिस्थिती दिसून येते. त्यामुळे राजकीय जुने विश्वस्त मंडळ बरखास्त करून नवीन नेमण्यात यावे यासाठी स्वाभिमानी मराठा महासंघाचे शिष्ट मंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

 या शिष्टमंडळात स्वाभिमानी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे, युवक प्रदेशाध्यक्ष कैलास रिंधे, महिला प्रदेशाध्यक्ष अर्चना धुळे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष अंकुश डांभे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, दीपक शेळके, रावसाहेब कावरे, नवनाथ वाघ आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या