Ticker

6/Breaking/ticker-posts

अर्थसंकल्यावर प्रा .भानुदास बेरड यांची प्रतिक्रिया..

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प ..
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )


 अहमदनगर : -महाविकास आघाडी सरकारने मांडलेला अर्थसंकल्प शेतकर्यांच्या तोंडाला पाने पाने पुसणारा आहे, अशी प्रतिक्रिया  भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी नोंदविली . 

कृषि, ग्राम विकास, रोजगार निर्मिति दृष्टीने हा अर्थ संकल्प निराशाजनक आहे, या अर्थ संकल्पात मुंबई, पुणे या शहरी भागासाठी मोठा निधी आणि ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष स्पष्ट पणे जाणवत आहे, त्याच बरोबर अपूर्ण राहिलेली शेतकरी कर्ज माफीसाठी कुठलीही तरतुद नाही, शेतीला नियमित पणे वीज पुरवठा होण्या साठी कोणतीच तरतुद नाही .

एकुणच महाराष्ट्रासाठी हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. त्याच बरोबर अहमदनगर सारखा मोठ्या जिल्हयाला शासकीय मेडिकल कॉलेज मिळणे गरजेचे होते .जिल्ह्याच्या दृष्टीने सुध्दा हा अर्थसंकल्प निराशाजनकच असल्याचे प्रा . बेरड म्हणाले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या