Ticker

6/Breaking/ticker-posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यात भेट, मंत्र्याना कानपिचक्या..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 

मुंबई :- अँटिलिया स्फोटके प्रकरणात एनआयएने या प्रकरणाचा तपास करणारे सहायक निरीक्षक सचिन वा यांनाच अटक केल्यानंतर राज्यातील घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. या प्रकरणावरून आक्रमक बनलेल्या विरोधकांनी विशेषत: भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर, दुसरीकडे पुढील बदनामी टाळण्यासाठी सावध पावले उचलण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री

अँटिलिया स्फोटके प्रकरणात एनआयएने या प्रकरणाचा तपास करणारे सहायक निरीक्षक 
सचिन वाजे  यांनाच अटक केल्यानंतर राज्यातील घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. या प्रकरणावरून आक्रमक बनलेल्या विरोधकांनी विशेषत: भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर, दुसरीकडे पुढील बदनामी टाळण्यासाठी सावध पावले उचलण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले आहे.

 या पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाली. शिवाय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक घेऊन याच मुद्द्यावर चर्चा केल्याचे समजते मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वर्षा निवासस्थानी सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेमधील तपशीलाविषयी कोणीही अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र एनआयएच्या पुढील तपासात राज्याचा गृह विभाग आणि एकूणच महाराष्ट्र विकास आघाडीवर विनाकारण कोणतेही शितोंडे उडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे कळते. एनआयएच्या तपासात एखादी गोष्ट समोर आल्यानंतर कारवाई करण्याऐवजी आधीच राज्य सरकार म्हणून जी काही आवश्यक कारवाई करावी लागेल ती करण्याबाबतही यावेळी ठरल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या