Ticker

6/Breaking/ticker-posts

'या' व्यक्तीकडे आहे 'सुपर अॅण्टीबॉडी'; करोनाच्या नव्या स्ट्रेनचाही परिणाम नाही !

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

वॉशिंग्टन: अमेरिकेतील वर्जिनिया राज्यातील एका व्यक्तीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या व्यक्तीकडे सुपर अॅण्टीबॉडी असल्याचे म्हटले जात आहे. या व्यक्तीच्या शरीरातील अॅण्टी बॉडी करोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रभावी आहे. या व्यक्तीच्या शरीरातील अॅण्टीबॉडीपासून लस विकसित करता येऊ शकते. त्यामुळे करोनाच्या नव्या वेरिएंटला अटकाव करता येऊ शकतो

जॉन हॉलिस असे या व्यक्तिचे नाव आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात १६ वर्षाच्या मुलासह जॉन युरोपमधून परतले होते. त्यावेळी त्यांना थोडा त्रास जाणवत होता. मात्र, गंभीर लक्षणे दिसत नव्हती. वातावरण बदलामुळे एलर्जी झाली असावी असे त्यांना वाटले. मात्र, काही आठवड्यानंतर त्यांच्या एका रुममेटला करोनाची बाधा झाली. त्याची प्रकृतीही चिंताजनक झाली. जॉन यांनी सांगितले की, आम्हाला करोनाबाबत फारशी माहिती नव्हती. माझा रुममेट अधिकच आजारी होता. त्यामुळे मलाही चिंता वाटू लागली. मुलाला पुन्हा एकदा भेटू शकणार नसल्याची भीती वाटत होती असेही त्यांनी सांगितले.

जॉन हॉलिस हे एका विद्यापीठात कम्युनिकेशन मॅनेजर आहेत. या विद्यापीठातील डॉक्टर लँस लिओट्टा हे करोना अॅण्टीबॉडीवर मानवी चाचणी करत होते. मागील वर्षी जुलै महिन्यात जॉन यांनी त्यांना चाचणीसाठी मदत केली होती. जॉन यांनी सांगितले की, माझ्या रुममेटलाही करोनाची लागण झाली होती. मात्र, मला करोना झाला नसल्याचे डॉक्टर लँस यांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरने जॉन यांच्या लाळेचे आणि रक्ताचे नमुने घेतले. त्यानंतर जॉन यांना करोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांच्या शरीरातील अॅण्टीबॉडीने करोना विषाणूचा खात्मा केला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टर लँस यांनी सांगितले की, जॉनच्या शरीरातील अॅण्टीबॉडीच खूपच प्रभावी आहेत. या अॅण्टीबॉडी रासायनिक द्रव्यात मिळवून १० हजार पटीने पातळ केल्या तरी आजारावर प्रभावी ठरू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या