Ticker

6/Breaking/ticker-posts

वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तहसीलवर धरणे आंदोलन.

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

जामखेड  :- केंद्र सरकारने जाहीर केलेले शेतकरी व कृषी विरोधी ३ काळे कायदे रद्द करावेत व देशातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

 वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अतिष पारवे, लोकाधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापू ओहोळ, सामाजिक कार्यकर्ते अरुण डोळस, मच्छीन्द्र जाधव, विशाल जाधव, विशाल पवार, बाळ गव्हानचे सरपंच कृष्णा खाडे, उप सरपंच राहुल गोपाळ घरे, योगेश सदाफुले, राकेश साळवे, दिपक माळी, नामेश धायतडक, कुंडल राळेभात, देवा देवकर, संदिप धायतडक, दिनेश ओहोळ आदी कार्यकते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

 वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खा. प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आवाहनानुसार केंद्र सरकारच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी ५ मार्च रोजी राज्यभरातील तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड.डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ११ वा. जामखेडच्या तहसिल कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तालुक्यातील कार्यकर्ते जमले. त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

 केंद्र सरकारने केलेले कायदे देशातील शेतकऱ्यांना व कृषी क्षेत्राला उध्वस्त करणारे व भांडवल शाहीचा पुरस्कार करणारे आहेत. ते कायदे मागे घ्यावेत यासाठी गेल्या ४ महिन्यांपासून देशातील शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करीत आहेत. पाऊस, वादळ, वारा व थंडी आणि आता उन्हाळ्याच्या तोंडावर या आंदोलन कर्त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी केंद्र सरकार या आंदोलन कर्त्यांचे दखल घेत नाहीत. त्या केंद्र सरकारवर ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी जोरदार टीका केली.  तालुका प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार जे. व्ही जायकर यांनी निवेदन स्वीकारले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या