Ticker

6/Breaking/ticker-posts

खरवंडी ग्रामपंचायत : म्हणुन सदस्यानी केला सभात्याग ..!

 खरवंडी  कासार ग्रामपंचायतच्या मासीक सभेला ग्रामस्थांची उपस्थिती 

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

खरखंडी कासार : -पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार ग्रामपंचायतच्या मासीक सभेमध्ये काही ग्रामस्थ उपस्थित राहील्याने ग्रामपंचायत  सदस्याने सभात्याग केला .

कोरोना विषाणु साथरोगामुळे  मुदत सपंच्या नतंर बऱ्याच कालखंडानतंर ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या सरपंच उपसरपंच निवडीची प्रक्रीया पार पडल्या नतंर गावकारभारी गावाला मिळाले  . अशातच कोरोनोच्या दुसऱ्या लाटेमुळे शासणा कडुन पुन्हा निर्बध सुरू झाले . जमावबंदी व शासन आदेशामुळे ग्रामसभा बंद आहेत .  गावाचा कारभार सुरळीत  सुरू रहावा  तसेच विविध विकास कामाचे आरखडे तयार करणे . विविध विकास कामास मजुंरी देणे म्हणुन कोव्हीड चे नेम पाळत ग्रामपंचायतच्या मासीक सभा होत आहेत मात्र ग्रामपंचायत सदस्याच्या मासीक सभेला  काही ग्रामस्थ बसल्याने उपसरपंच दिलीप पवळे ग्रामपंचायत सदस्या सविता डोगंरे सविता अंदुरे सचीन ढोले शशीकला सोनवणे युसुफ बागवान गणेश जगताप सुनंदा सागंळे यांनी सभात्याग केल्याची माहीती सरपंच प्रदीप पाटील यांनी दिली . 

याबाबत ग्रामविकास अधीकारी अशोक दहिफळे म्हणाले की खरवंडी कासार ग्रामपंचायत मासीक सभा आज बोलवण्यात आली होती कोरम पुर्ण झाल्याने सभेला सुरूवात झाली होती सभेत काही ग्रामस्थ उपस्थित होते  त्यामुळे सदस्य बैठकीतुन उठुन गेले आता पुन्हा सभेचा  अजेठां काढुन मासीक सभा बोलवण्यात येईल यापुढे ग्रामपंचायत सदस्याच्या बैठकीला ग्रामस्थाना बसता येणार नाही 

मासीक सभेला ग्रामस्थानी उपस्थित राहने चुकीचे आहे  ग्रामपंचायत सबंधी गावातिल ग्रामस्थाच्या काही तक्रारी असल्यास मासिक सभेपुर्वी ग्रामपंचायतकडे लेखी तक्रार करावी त्यांच्या  तक्रारी ची आम्ही   सदस्य बैठकीत चर्चा करू त्यांच्या तक्रारीचे निवारण करू  तसेच ग्रामसभेला जास्ती जास्त ग्रामस्थानी उपस्थित राहुन चर्चा करावी ,असे आवाहन सरपंच प्रदीप पाटील यांनी सांगितले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या