Ticker

6/Breaking/ticker-posts

शहर लवकरच खड्डेमुक्त करण्याचा आपला प्रयत्न –आ.जगताप

 

नगरोत्थान निधीतील कामांचा आ.जगतापांच्या हस्ते लोकार्पण 
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:- नगरोत्थानचा निधी आल्यानंतर शहरातील विविध कामासह प्रभाग तिनच्या कामाना देखील गती देण्यात आली होती. नगर शहरातील नागरीकांना सुविधा देण्याासाठी आपण प्रयत्नशील असून लवकरच शहर खड्डेमुक्त करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. विज, पाणी, रस्ते, ड्रेनेज आदीसह विविध कामांना शहरात गती देण्याचे काम करण्यात येत असून यातुन शहराचा विकास निश्‍चितच होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

 आमदार संग्राम  जगताप व नगरसेवक खान समद हाजी वहाब यांच्या विशेष प्रयत्नातुन महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान निधी 2019-20 च्या निधीमधुन प्रभाग 3 मधील गोविंदपुरा अंतर्गत धाराणी भंगारवाला ते अ‍ॅड.हाफिज जहागीरदार घर ते जग्गी घरापर्यत रस्ता कॉक्रेटीकरण कामाचे लोकार्पण सोहळा नुकताच  आ.जगताप यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.

 यावेळी  सामाजिक कार्यकर्ते बाबा खान , फारूक शेख सामाजिक कार्यकर्ते,हाफिज जहागीरदार नोटरी पब्लिक, इंजि.शेख रियाज, इंजि कुमार चमनलाल,परविंदर नारंग,शेख आरीफ,कलीम खान, हितेश कुमार,अशोक जग्गी, जसपाल कंधारी, अशोक रोहिडा,अ‍ॅड आमीन धाराणी, अ‍ॅड फारूक शेख, महेमुद सर, निजाम भाई जहागीरदार, अ‍ॅड तन्वीर शेख,नूर भाई कॉन्ट्रॅक्टर, अलनूर चारणिया, सलीम चारणिया, अल्लाउद्दीन पारपिया, फारूक शेख, अरकान जहागीरदार,गौरव जग्गी,वसीम पठाण,असकार जहागीरदार, शोएब खान,रमीज शेख, कृणाल जग्गी, जावेद कान संतोष ढाकणे विकार सय्यद आदीसह परिसरातील नागरीक उपस्थित होते.

 नगरसेवक समदखान म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून प्रभाग 3 मध्ये विविध समस्या भेडसावत होत्या, मात्र, आमदार जगताप याच्याकडे येथील कामे मार्गी लागावती यासाठी वारंवार पाठपुरवा केला. यातुन त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवुन व नगारीकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या भागातील विविध कामांना गती देऊन कामे पुर्ण करण्यावर लक्ष दिल्याने आज अनेक कामे मार्गी लागली आहे. भविष्यात या भागाचा विकास जोमाने करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या