Ticker

6/Breaking/ticker-posts

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांाना वेळेवर वेतन द्या-बाबासाहेब बोडखे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर:-शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन मिळावे तसेच मार्च महिन्याचे वेतन एप्रिलच्या 5 तारखेच्या आत मिळण्यासाठी संबंधितांना सूचना करण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने मुंबई विभाग अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, उपाध्यक्ष प्रकाशचंद्र मिश्रा, संघटन मंत्री सुहास हिर्लेकर यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना तर शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निवेदन दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या अगोदरच शिक्षण संचालक व शिक्षक आयुक्त यांना पत्र देऊन डीसीपीएस योजनेतील निधी एनपीएसमध्ये वर्ग करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये वेतन बिले अद्याप जमा होऊ शकलेले नाहीत. याबाबतीत योग्य ते निर्देश देऊन मार्च महिन्याचे वेतन वेळेवर करण्याची विनंती केलेली आहे. तर मार्च महिन्याच्या वेतनासाठी वेतन निधी जिल्हा वेतन पथकाकडे जमा झालेला नाही. त्यामुळे मार्च महिन्याचे वेतन लांबणीवर जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच काही शाळांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन अजूनही देण्यात आलेले नाही. त्यामुळे कर्जाचे हप्ते भरताना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सोसावा लागत आहे. तसे अनेक शालेय कर्मचार्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

मार्च महिन्याचे वेतन तरी वेळेत मिळावे याकरिता उचित कार्यवाही होण्याची अपेक्षा आहे. वेतन वेळेत मिळत नसल्याचे अनेक तक्रारी शिक्षक परिषदेला मिळत आहे. याची तात्काळ दखल घेऊन वेतन निधी उपलब्ध करून देण्याचे संबंधितांना निर्देश द्यावे, वेतन बिले जमा करण्यासाठी एनपीएसमध्ये निधी वर्ग करण्याबाबत ज्या काही अडचणी निर्माण झाल्या आहेत त्या तातडीने दुरुस्त करून मार्च महिन्याचे वेतन किमान एप्रिलच्या पाच तारखेपर्यंत मिळण्यासाठी संबधितांना निर्देश देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली असल्याचे बोडखे यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या