Ticker

6/Breaking/ticker-posts

आजही कोरोंना बाधित ३०० पार ; नगरचे टेंशन कायम..!

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अहमदनगर: जिल्ह्यात आज २१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार २२७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १७४० इतकी झाली आहे.

दरम्यान  रुग्ण वाढीचा वेग नगर जिल्हयात तिप्पट असल्याने नगरचे टेंशन  वाढू लागले आहे औरंगाबाद नंतर नगरला ही अंशतः लॉकडाऊन करावा काय अशा विचारात प्रशासन आहे . तथापि याबाबत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री सायंकाळी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत . त्यानंतर निर्बंध अधिक कडक केले जातील . अंशतः लॉक जाऊन बाबत काय निर्णय होतो याकडे शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .

दरम्यान जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७३ आणि अँटीजेन चाचणीत ०३ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३७, अकोले ०१, जामखेड ०२, कर्जत  ०१, कोपरगाव ०३नगर ग्रामीण ०८, नेवासा ०४, पारनेर ०२, राहाता ०३, राहुरी ०६, संगमनेर ४६, शेवगाव ३१, श्रीरामपूर ०१, कॅन्टोन्मेंट ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५४, अकोले ०५ ,कर्जत ०१कोपरगाव ०१, नगर ग्रामीण १२, नेवासा ०८पारनेर ११, पाथर्डी ०४, राहाता १८, राहुरी १०, संगमनेर २४, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ०२, इतर जिल्हा ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ०३ जण बाधित आढळुन आले. पाथर्डी ०१ आणि राहुरी ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ७४, अकोले ०९, जामखेड ०३, कर्जत ०३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण ११, नेवासा ०४, पारनेर ०६, पाथर्डी ०२, राहाता १८, राहुरी ०२, संगमनेर ४१,शेवगाव १२श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ०७, आणि इतर जिल्हा ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:७५२२७*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १७४०*

*मृत्यू:११५७*

*एकूण रूग्ण संख्या:७८१२४*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या