Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक : अध्यक्षपदी उदय शेळके, तर माधवराव कानवडे उपाध्यक्ष ..!


 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर : -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष अ‍ॅड. उदय गुलाबराव शेळके यांची तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी शनिवारी (आज) काही वेळात निवडी जाहीर होणार आहेत. या पदासाठी अ‍ॅड. शेळके यांचे नाव सुरूवातीपासूनच आघाडीवर होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सकाळपासूनच यासाठी नगरमध्ये तळ ठोकला होता. काल मुबईत दीर्घ चर्चा झाली त्यामध्ये या नावावर एकमत घडवून आले .

जिल्ह्याच्या राजकारणात जिल्हा बँकेचे महत्व अनन्य साधारण असून कारखानदारी आणि सहकाराची कामधेनू असलेल्या जिल्हा बॅकेवर वर्चस्व राखण्यासाठी सर्वच नेतेमंडळी आग्रही असतात . त्यामुळेच निवडणूकीच्या टप्प्यावर सहमतीचे राजकारण झाले . त्यात मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बहुमत करीत बाजी मारली . त्याच अनुषंगाने अध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागते याकडे जिल्हयाचे लक्ष लागले होते .

प्रारंभी पासून माजी आ. चंदशेखर घुले . राहूल जगताप यांची नावे चर्चीली गेली . अंतिम टप्यात भानुदास मुरकुटे यांचे देखिल नाव चर्चेत आले . मात्र श्रेष्ठांनी अनुभव . विश्वास अन् विरोधकांना समर्थपणे तोंड देऊ शकेल अशी निकषाची त्रिसूत्री चाचपून उदय शेळके यांचे नावावर मोहोर उमटली .यावेळी अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला मिळाली असून, उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले आहे. अ‍ॅड. शेळके हे राष्ट्रवादीचे आहेत. कानवडे महसूलमंत्री थोरात यांचे कट्टर समर्थक मानले जातात .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या