Ticker

6/Breaking/ticker-posts

गुन्हा दाखल झाल्यावरच नातेवाईकानी तरुणाचा मृतदेह घेतला ताब्यात..

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

शेवगाव :-  शेतीच्या वादातून ठाकुर पिंपळगाव येथे झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याने मारहाण करणाऱ्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी नातेवाईकांनी मयत तरुणाचा मृतदेह शेवगाव पोलिस ठाण्यात आणून ठेवल्याची घटना शनिवारी ( दि.२० ) रोजी घडली. मृतदेह पोलिस ठाण्यात आणण्यात आल्याने  ठाण्यात वातावरण तणावपूर्ण बनले. रात्री उशिरापर्यंत त्या तरुणाचा मृतदेह गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यातच पडून होता.

 पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतल्यानंतर रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास त्या तरुणाच्या मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ठाकूर पिंपळगाव या गावी नातेवाईक घेऊन गेले. मृत तरुणाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकूर पिंपळगाव येथे शेतीच्या वादातून हरिभाऊ पांडुरंग बदडे, वय ४० वर्षे यांना त्यांच्या नात्यातील काही व्यक्तींनी शुक्रवारी ( दि. १२ ) रोजी मारहाण केली होती. त्यानंतर चर्चेतून सदरचे प्रकरण मिटले होते. दरम्यान शुक्रवार (दि.१९) रोजी सायंकाळी हरीभाऊ हे घरी येत असताना त्यास पुन्हा मारहाण करण्यात आली. पुन्हा मारहाण होईल या भीतीने ते घरी येऊन झोपले असता सकाळी त्यांना घराच्या लोकांनी उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते उठले नाही. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर  मृत हरीभाऊ यांना मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यामागणीसाठी नातेवाईकांनी हा मृतदेह पोलिस ठाण्यात आणून ठेवला होता. 

 या प्रकाराने शेवगाव पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रणजित ढेरे व नेवासा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी शेवगावमध्ये दाखल झाल्याने पोलिस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते. या प्रकरणातील मृत तरुणाचा मृत्य हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा शवविच्छेदन अहवाल असल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिली. असुन संबंधीत व्यक्तींच्या विरोधात ३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने नातेवाईकाने मृतदेह ताब्यात घेतला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या