Ticker

6/Breaking/ticker-posts

रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरावा करु - आ.संग्राम जगताप

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नगर :- शहरच्या विकासात प्रत्येकांचे योगदान राहिले पाहिजे. शहरातील भैतिक सुविधांबरोबरच तेथील बाजारपेठ आणि इतर सेवांवर शहराची ओळख होत असते. त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करुन  नागरिकांबरोबरच शहरात येणार्‍यांना चांगली सेवा दिली पाहिजे. कोरोना काळात अनेकांच्या व्यवसायावर परिणाम झाला, त्यात रिक्षा चालकांचेही हाल झाले. या दरम्यान त्यांना मदतीचा हात देण्यात आला. आता परिस्थिती सुधारत असल्याने रिक्षा चालकांनी स्वत:बरोबर प्रवाशांची सुरक्षित वाहतुक करावी. शासनाकडील आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत पाठपुरवा करु, असे आश्‍वासन आ.संग्राम जगताप यांनी दिले.

 तारकपुर रिक्षा स्टॉपचे उद्घाटन आ.संग्राम जगताप  यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश घुले, संजय चोपडा, दत्ता वामन, विलास कराळे, अशोक औशिकर, नासिर खान, कैय्युम शेख आरिफ, समीर शेख, फैय्याज सय्यद, मोईम शेख, साजिद शेख, फरहान शेख, अर्शद सय्यद, अजहर शेख आदि उपस्थित होते.

 याप्रसंगी अविनाश घुले म्हणाले, हमाल-मापाडी, बांधकाम कामगार यांच्याबरोबरच रिक्षा-टॅक्सी चालकांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या अडअडचणी सोडविण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न केले जात आहे. संघटन मजबूत करुन आपण आपले हक्क मिळविले पाहिजे. आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्यावतीने शासनाकडे रिक्षा चालकांच्या प्रश्‍नांबाबत पाठपुरवा सुरु आहे. सर्वांनी शासनाच्या नियमाचे पालन करावे. रिक्षा-टॅक्स चालकांनीही संघटनेच्या कार्यात सहभागी होऊन आपली एकजुट दाखवावी, जेणे करुन प्रश्‍न सोडविण्यास त्याचा चांगला उपयोग होईल, असे सांगितले.

याप्रसंगी दत्ता वामन यांनी संघटनेच्या माध्यमातून रिक्षा चालकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आपणही प्रवाशांना चांगली सेवा देऊन त्यांचा विश्‍वास संपादन करावा. आ.संग्राम जगताप व संघटनेचे नेते अविनाश घुले यांचे मोठे सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अविनाश घुले यांची मनपा स्थायी समितीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.  शेवटी नासिर खान यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या