Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्र अर्थसकंल्प २०२१; 'या' आहेत 'बजेट'मधील ठळक घोषणा

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचं २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. शेतकरी, महिला, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक यांचा विचार करत आरोग्य, शिक्षण, नगर विकास, पायाभूत सुविधा यांसाठी अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्या.

अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा
- शालेय विद्यार्थींना बसने मोफत प्रवास
- महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत
- गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद
- राज्यातील महत्वाच्या १२ धरणांच्या बळकटीसाठी ६२४ कोटी
- शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने
- मद्यावर करवाढ, आता ६५ टक्के कर
- उस्मानाबाद, सिंधुदूर्ग, अमरावती, परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार
- आपत्ती व्यवस्थापनासाठी ११३१५ कोटींची तरतूद
- पुण्यात रिंग रोडची घोषणा, २४ हजार कोटींचा निधी
- आरोग्य सेवेसाठी ७ हजार कोटींची तरतूद
- रस्ते विकासासाठी १२ हजार ९५० कोटींच्या निधीची तरतूद
- पुणे -नाशिक रेल्वे मार्ग उभारणार, यासाठी १६१३९ कोटींची तरतूद
- जलसंपदा विभागासाठी १२९१९ कोटींची तरतूद
- पशुसंवर्धन व मत्स्य विभागासाठी ३७०० कोटींची तरतूद
- राज्यातील प्राचीन मंदिरांचे ८ प्राचीन मंदिरांचे जतन करणार
-मुंबईतली कोस्टल मार्ग २०२४ पर्यंत पूर्ण करणार

- पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार

- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या खर्चासाठी ४०० कोटी
- बस स्थानकांच्या विकासाठी १४०० कोटींची तरतूद, परिवहन विभागासाठी २५७० कोटींची तरतूद
- नाशिक-मुंबई, एक्सप्रेस वे, समृद्धी मार्गावर मेगा इलेक्ट्रीक चार्जिंग सेंटर उभारणार
- पूर्वमुक्त मार्गाला विलासराव देशमुखांचे नाव देणार
- सारथी, बार्टी संस्थांना प्रत्येकी १५० कोटी रुपयांची तरतूद
- शासकीय रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणार
-ज्येष्ठ पत्रकारांच्या निवृत्तीवेतनात आणखी १० कोटीची तरतूद
- मुंबईत रेल्वे रुळांवर ७ उड्डाणपूल उभारणार
- शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प २०२२ ला पूर्ण करणार
- वरळी ते शिवडी पूलाचे काम ३ वर्षात पूर्ण करणार
- मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवणार
- मुंबईत पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर सायकल चालवण्यासाठी विशेष मार्गिका बांधणार
- वसई ते कल्याण जलमार्ग सुरु करणार, कोलशेत, काल्हेर, डोंबिवली, मीरा भाईंदरला जेट्टी उभाणार
- करोनाच्या काळातही राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक, १.१२ लाख कोटींचे करार पूर्ण , तीन लाख नवे रोजगार अपेक्षित
- पुण्याजवळ नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
-युवकांसाठी नवीन कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्यास परवानगी
- जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळांच्या पुनरुज्जीवनासाठी ३००० कोटींची तरतूद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या