Ticker

6/Breaking/ticker-posts

वसीम रिझवी विरोधात संतापाची लाट , अहमदनगरमधील मुस्लिमांनी केली कारवाईची मागणी लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:- कुराणमधील २६ आयत हटविण्याचे वक्तव्य करुन यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे शिया वक्फ बोर्डचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांच्याविरोधात मुस्लिम समाजात संतापाची लाट उलसळी आहे. रिझवी यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असून देशाची शांतताही भंग केली आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी अहमदनगरमधील मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.


समाजातर्फे समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली. त्यांनी म्हटले आहे की, ‘रिझवी यांनी कुराणच्या आयतचा चुकीचा अर्थ काढून आपल्या अज्ञानाचे व मानसिक संतुलन बिघडल्याचे दर्शन घडविले आहे. रिझवी यांनी कुरान मधील २६ आयत दहशतवादाला उत्तेजन देत असल्याचे चुकीचे आरोप करीत ही आयात कुराणमधून काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

रिझवी यांनी अपूर्ण अभ्यासाच्या आधारावर कुराणच्या त्या २६ आयत मधील जिहादचा चुकीचा अर्थ लावला आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मियांची प्रतिमा मलीन करण्याचे काम त्यांनी केले आहे. जातीयवादी संघटना व राजकीय पक्षांना भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले आहे. लखनऊ येथे झालेल्या मुस्लिम समुदायाच्या संमेलनमध्ये त्यांना इस्लाम धर्मातून काढून टाकण्यात आले आहे. तरीही रिझवी हा चुकीचा संदेश मोठ्या प्रमाणात पसरवत आहेत.

 संपूर्ण देशात मुस्लिम समाज त्यांच्या विरोधात पेटून उठला असून, हे प्रकरण संयमाने हातळण्याची गरज आहे. भारतीय संविधानाच्या घटनेने सर्व नागरिकांना धर्म स्वातंत्र्य व त्याचे रक्षण करण्याचा अधिकार दिला असून, कोणत्याही धार्मिक ग्रंथात सर्वोच्च न्यायालय देखील बदल करू शकत नाही. असे असतानाही रिजवी यांनी कुराणबद्दल चुकीचा संदेश पसरवून जनहित याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायलयानेही यावर योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. रिझवी यांनी देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावून देशात शांतता व कायदा सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अहमदनगरमधील मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या