Ticker

6/Breaking/ticker-posts

औरंगाबदमध्ये करोनाने ८ मृत्यू, १२७१ बाधितांचा उच्चांक..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

औरंगाबादः जिल्ह्यातील सात, तर जालना जिल्ह्यातील एका बाधिताचा घाटीत मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण करोना बळींची १३५१ झाली आहे. त्याचवेळी पुन्हा मंगळवारी (१६ मार्च) १२७१ नव्या बाधितांचा (शहरः १०११, ग्रामीणः २३९, अँटिजेनः २१) उच्चांक स्पष्ट झाला व त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या ६०,१०० पर्यंत पोहोचली आहे. तसेच मंगळवारी जिल्ह्यात ३८४ बाधित हे करोनामुक्त झाल्याने आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ५२,०७३ झाली आहे व सध्या ६,६७६ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

शहरात १०११ नवे बाधित
शहरातील नव्या बाधितांमध्ये घाटी परिसर ६, जिजामाता कॉलनी १, सातारा परिसर २३, एकनाथ नगर ३, नागेश्वरवाडी ३, उल्कानगरी ९, गारखेडा २५, हडको २, सिडको छत्रपती नगर २, काझीपुरा १, पडेगाव ५, शासकीय वैद्यकीय मुलांचे वसतिगृह २, खडकेश्वर ४, बिसमिल्ला कॉलनी १, सिडको एन-आठ ८, वेदांत नगर ७, एन-दोन सिडको १०, गादिया विहार ६, रशिदपुरा १, एन-११ येथे ९, बोहरी कट्टा २, राजनगर २, कोंकणवाडी ३, तापडिया प्राईड पैठण रोड २, दशमेश नगर १, बन्सीलाल नगर ४, पद्मपूरा ७, जालान नगर ५, अजब नगर २, माळीवाडा १, प्रताप नगर ५, कैलास नगर ६, गजानन नगर ४, सादत नगर १, श्रीकृष्ण नगर ३, उस्मानपूरा १३, एन-तीन सिडको १२, रोझा बाग १, तुषार नगर १, म्हाडा कॉलनी ५, एन-चार सिडको १३, पद्मपाणी कॉलनी एमआयडीसी १, विनायक नगर १, कासलीवाल मार्व्हल ४, पीर बाजार १, नंदादीप कॉलनी १, नक्षत्रवाडी ३, सारा सिटी १, एन-नऊ ५, देवळाई परिसर ४, दशमेश नगर १, कलेक्टर ऑफीस १, स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया १, ग्रँड कैलास हॉटेल १, कांचनवाडी ३, अंबिका नगर १ टाऊन हॉल १, मुकुंदवाडी ६, कामगार चौकी १, ठाकरे नगर ३, मोती नगर २, टाऊन सेंटर १, जय भवानी नगर ६, चिकलठाणा ८, संघर्ष नगर १, विश्रांती नगर २, एसबीआय मुख्य कार्यालय १, विठ्ठल नगर २, सुंदरवाडी १, न्यायमूर्ती नगर १, पुंडलिक नगर ४, प्रकाश नगर २, एन-१३ येथे १, सुधाकर नगर २, बीड बायपास रोड १६, शहानूरवाडी ५, ग्रीन्स कॉलनी १, अर्बन व्हॅली १, बायजीपुरा २, हर्सूल २, दिशा नगरी १, अथर्व रॉयल्स सोसायटी १, शांतीपुरा २, रेणुका नगर १, ग्रीन्स बजाज हॉस्पिटल समोर १, जानकीपुरी कॉलनी १, शहानूरमियॉ दर्गा ३, हनुमान नगर ३, विश्रांती नगर १, समर्थ नगर ७, चेलीपुरा १, बेगमपुरा १, दिवाण देवडी १, सह्याद्री हिल्स १, चाटे स्कुलजवळ १, म्हसोबा नगर १, सिटी चौक २, बालाजी नगर ४, रॉक्सी टॉकीज १, देवा नगरी २, रेहान कॉलनी १, सराफा रोड १, शांतिनिकेतन कॉलनी १, मोंढा नाका १, पुष्पनगरी २, सेंट्रल नाका १, श्रेयनगर १, जमना अपार्टमेंट १, एमजीएम स्टाफ १, शहागंज २, पीडब्लुडी कॉलनी १, भारत नगर १, एन-एक सिडको ३, आकाशवाणी २, एन-सात ३, जाधववाडी ४, संजय नगर १, कटकट गेट १, एन-पाच सिडको २, रघुवीर नगर १, एन-सहा सिडको १०, शिवाजीनगर १६, अरिहंत नगर १, पवन नगर १, मयुर पार्क ३, कोटला कॉलनी १, जालना रोड १, त्रिमुर्ती चौक १, तापडिया नगर ३, एसटी कॉलनी १, विष्णू नगर ५, देशमुख नगर १, विजय नगर ३, तोरणा नगर १, हर्सुल ६, गजानन कॉलनी १, जयभवानी नगर १, हुसेन कॉलनी १, आदित्य नगर १, हडको कॉर्नर १, टिळक नगर २, वसंत विहार १, एमजीएम होस्टेल २, एसटी कॉलनी जाधववाडी १, जय भवानी नगर १, एसबी कॉलनी १, चिंतामणी कॉलनी ३, खोकडपुरा १, तेरावरी योजना सिडको १, ज्योती नगर ५, कुंभारवाडा १, भाग्य नगर १, जटवाडा रोड २, एन-१२ येथे २, म्हाडा कॉलनी ३, रेल्वे स्टेशन ४, उत्तारा नगरी १, सिडको २, ब्रिजवाडी १, विद्यानारायण गगर १, आयोध्या नगर १, जागृत हनुमान मंदिर १, मंगलमुर्ती हाऊसिंग सोसायटी १, कडा भवन १, सनी सेंटर १, सेव्हन हिल १, दिल्ली गेट १, साईनगर १, भावसिंगपूरा १, एमजीएम कॅम्पस १, अदालत रोड १, दर्जी बाजार छावणी १, पहाडसिंगपूरा १, भडकल गेट १, आलोक नगर सातारा १, नंदनवन कॉलनी १, मोंढा मिसारवाडी १, बसैये नगर १, सह्याद्री नगर १, हरिराम नगर १, इंदिरा नगर २, मयुरबन कॉलनी १, नाथ व्हॅली शाळा १, एसआरपीएफ कॅम्प १, ज्युबली पार्क १, उमर कॉलनी १, निशांत पार्क २, विनायक नगर १, अरुणोद्यय कॉलनी १ व इतर ठिकाणच्या ४९१ व्यक्तींचा समावेश आहे.

ग्रामीण भागात २३९ नवे बाधित
बजाजनगर २८, रांजणगाव २, देऊळगाव बाजार सिल्लोड १, सारा परिवर्तन हर्सूल सावंगी ४, म्हाडा कॉलनी पंढरपूर १, चिते पिंपळगाव १, गोलवाडी शिवार १, मिरसीपुरा अजिंठा १, पिसादेवी ३, अब्दीमंडी १, वांजरवाडी ७, वडगाव १, सिडको वाळूज १, लिंबे जळगाव १, तिसगाव ६, सिडको महानगर १, विठ्ठलभूमी पंढरपूर १, गंगोत्री पार्क १, सुविधा हॉटेल १, गजानन महाराज हाऊसिंग सोसायटी १, साजापूर १, ईटखेडा १, वाळूज १, वडगाव कोल्हाटी २, साजापूर वाळूज १, वाळूज महानगर १, पंढरपूर १, अंबेलोहळ गंगापूर १, शेंद्र एमआयडीसी १, रांजणगाव एमआयडीसी १, गोळेगाव १ व इतर ठिकाणच्या व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात अँटीजन-२१ चाचण्या करण्यात आहे.

घाटीत ८ बाधितांचा मृत्यू
खडकेश्वर येथील ८१ वर्षीय पुरुष, श्रीकृष्ण नगर, हडको येथील ६८ वर्षीय पुरुष, भडकल गेट परिसरातील ६३ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ७२ वर्षीय महिला, जैतापूर येथील ६१ वर्षीय पुरुष, फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथील ९५ वर्षीय महिला, वाळूज येथील ५५ वर्षीय पुरुष, तर जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वारखेडा येथील ६५ वर्षीय महिला, या आठ बाधितांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोना बळींची संख्या १३५१ झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या