Ticker

6/Breaking/ticker-posts

सचिन वाझे प्रकरण: ठाकरे सरकारकडून आज मोठ्या निर्णयांची शक्यता

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

मुंबई:- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानासमोर सापडलेल्या स्फोटके प्रकरणी एनआयए ही केंद्रीय तपाससंस्था करीत असलेल्या तपासामुळे मुंबई पोलिसांपुढील अडचणी वाढत असताना त्याचा सरकारला फटका बसू नये, यासाठी सरकारातील धुरिणांनी स्वतःची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे पोलिस महासंचालक हेमंत नगराळे आणि मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याशी 'वर्षा' या निवासस्थानी जवळपास अडीच तास चर्चा केली. त्यास अनुसरून आज, बुधवारी सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली असून त्यात पोलिस दलातील फेरबदल, तसेच इतर काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्फोटके प्रकरणातील पोलिस तपास अधिकारी सचिन वाझे यांनाच एनआयएने अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हे प्रकरण विरोधी पक्षाच्या राजकारणाचा भाग आहे की काय असे समजून त्याला राजकीय पद्धतीने उत्तरे देण्याची राज्य सरकारने तयारी सुरू केली होती. मात्र एनआयएच्या तपासात धक्कादायक माहिती पुढे येऊ लागल्याने राज्य सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी रात्री पोलिस महासंचालक आणि मुंबईचे पोलिस आयुक्त यांच्यासोबत मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत रात्री उशिरा गृहमंत्री अनिल देशमुख देखील सहभागी झाले. या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. पवार हे मंगळवारी दिल्लीत होते. दरम्यान, या बैठकीत एकूणच सविस्तर माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज, बुधवारी सकाळी आघाडीच्या प्रमुख मंत्र्यांची बैठक बोलावली असून त्यात काही महत्त्वाचे निर्णय होईल असे समजते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या