Ticker

6/Breaking/ticker-posts

देशात करोना वाढला, PM मोदींची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

नवी दिल्लीः देशात करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणखी वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात करोनाचा दुसरी लाट आली आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि आता पंजाबमध्येही करोनाचा संसर्ग वाढत आहे. मध्य प्रदेशात राजधानी भोपाळ आणि इंदूरमध्ये बुधवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत. तर गुजरातमध्ये अहमदाबाद, बडोदा, सूरत आणि राजकोटमध्ये ३१ मार्चपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. पण संचारबंदीचा कालावधी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत आहे. तर पंजाबमधील रुपनगर जिल्ह्यात मंगळवारपासून रात्री ११ वाजेपासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरयाणात करोनाचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येत आढळून येत आहेत. गेल्या २४ तासांत एकूण रुग्णांपैकी २१ हजार रुग्ण हे या आठ राज्यांत आढळून आले आहेत. हा आकडा देशातील ८६.३९ टक्के इतका आहे.

पंतप्रधान मोदी आज मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद
देशातील करोनाची स्थिती आणि लसीकरण मोहीमेाबाबत पंतप्रधान मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज संवाद साधणार आहेत. करोना व्हायरसचे संकट आल्यापासून पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत आले आहेत. यापूर्वी पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी शेवटचा संवाद हा देशात लसीकरण मोहीम सुरू होण्याच्याआधी जानेवारीत झाला होता.

सोमवारी देशात २४, ४३७ पॉझिटिव्ह
देशात पुन्हा एकदा २० हजारांहून अधिक करोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारी करोनाच्या नवीन रुग्णांची संख्या २४,४३७ इतकी होती. २०,१८६ जण करोनामुक्त आणि १३० जणांचा मृत्यू झालाय. या महिन्यात फक्त १५ दिवसांत २ लाख ९७ हजार ५३९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

महाराष्ट्रात १७ हजारांवर नवीन रुग्ण आढळले
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. करोनाने राज्यातील स्थिती चिंताजनक होत चालली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १७ हजार ८६४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. सोमवारच्या तुलनेत ही वाढ २ हजार ८१३ ने अधिक आहे. ही संख्या आधी १५ हजार ०५१ एवढी होती. या बरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण ९ हजार ५१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता राज्यातील करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही १ लाख ३८ हजार ८१३ इतकी झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या