Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर जिल्ह्यातील 'या' शहरात ७ दिवसाचा लॉकडाऊन ..!

 लोकनेता न्यूज ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

राहाता : -राहाता शहरमध्ये  कोरोनाचे रुग्ण वाढ वेगावर  आता ७ दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राहाता नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

कोरोनाने अहमदनगर जिल्ह्यात आपले हातपाय चांगलेच पसरवले आहेत. प्रशासन अनेक उपाययोजना करताना दिसत आहे परंतु कोरोना थांबण्याचे नाव घेत नाही. ग्रामीण भागातही कोरोनाने चांगलाच शिरकाव केल्याचे चित्र आहे. त्यात राहाता शहरमध्ये जास्तच कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. यामुळे राहाता शहर ३० मार्चपासून सात दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय राहाता नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राहता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये दवाखाने, मेडिकल व वैद्यकीय सेवा वगळता इतर व्यवसायीकांना आपले व्यवसाय सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या