Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जुले हर्या येथील राजीव गांधी अभियांत्रिकी विद्यार्थ्याचे यश

 एक लाख रूपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. 








लोकनेता
 न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर:- हॅकेथॉन २०२१ स्पर्धेमध्ये कर्जुले हर्या येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचे यश,एक लाख रूपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे "Centre for Innovation Incubation & Linkages" आणि पिंपरी चिंचवड स्टार्टअप इनक्यूबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने इनोफेस्ट समिट - २०२१ ही स्पर्धा दिनांक ५ व ६ मार्च २०२१ रोजी सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठा मध्ये पार पडली. 

 या स्पर्धेमध्ये कर्जुले हर्याच्या मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठान आणे संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी महाविद्यालयातील संगणक विभागातील अंतिम वर्षातील विद्यार्थी कुणाल पांडे, प्रतीक्षा थोरात, सुवर्णा उंडे, काजल पिंगळे या टीमने हॅकेथॉन Innofest Summit - 2021 या स्पर्धेमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्ज (IOT) व मशीन लर्निंग (ML) या तंत्रज्ञानाचा वापर करून हवेतील प्रदूषणाचे घटकांचे विश्लेषण व माहितीची देखरेख या विषयावर सादरी करण केले व तृतीय क्रमांक पटकाविला या टीमला एक लाख रुपयाचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. 

  या प्रकल्पात हवेतील तापमान,आद्रता,कार्बन मोनॉक्साईड,कार्बनडायऑक्साईड,एलपीजी,स्मोक,अल्कोहोल इत्यादी घटकांच्या माहितीचे देखरेख सेन्सर वापरून करण्यात आली आहे तसेच या सर्व माहितीचे विश्लेषण मशीन लर्निग या तंत्रज्ञाचा वापर करून कमीत कमी खर्चात करण्यात आले आहे. 

हॅकेथॉन या सँर्धेसाठी विध्यार्थाना संगणक विभागातील प्रा.पल्लवी राहिंज,विभागप्रमुख प्रा.निवृत्ती चौधरी,प्रा. सदाशिव शिंदे व प्रा.ताई पवार यांनी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य प्रा.भाऊसाहेब शिंदे व समन्वयक प्रा.ईश्वर कोरडे,प्राचार्य डॉ.पांडुरंग तिडके यांचे या विध्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

 या गुणवंत विदयार्थ्यांचे मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.मीराताई आहेर,सचिव किरण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.दिपक आहेर,खजिनदार बाळासाहेब उंडे, कार्यालयीन अधीक्षक संतोष पवार,प्रा.प्रवीण औटी, प्रा.गणेश कुलकर्णी,प्रा.अनिरुद्ध जगदाळे,प्रा.संदीप गात, प्रा.बालाजी पटणे, प्रा.विजय आहेर, प्रा.सतीश गुंजाळ, प्रा.महेश बुळे यांनी सर्व  विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या