Ticker

6/Breaking/ticker-posts

भाळवणी येथील महाशिवरात्रोत्सव रद्द, स्थानिक यात्रा कमिटी व ग्रामस्थांचा निर्णय.

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

पारनेर:- (दादा भालेकर) सालाबादप्रमाणे पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र भाळवणी येथे गुरुवार दि.११ मार्च रोजी होणारा महाशिवरात्र उत्सव यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच प्रशासनाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला आहे. 

     दरवर्षी पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील श्रीक्षेत्र भगवान नागेश्वर मंदीराच्या प्रांगणात भरणारा दोन दिवसीय यात्रोत्सव परिसरातील भाविक व मल्लांसाठी एक पर्वणी असतो.परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आदेशानुसार दि.११ रोजी होणारा लघुरुद्राभिषेक,संपूर्ण दिवसभर भाविकांची दर्शनबारी, व्यावसायिक दुकानदार,महाप्रसाद,रात्रीचे किर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दुसऱ्या दिवशी दि.१२ रोजी भरणारा भव्य कुस्त्यांचा आखाडा आदि सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचा निर्णय यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला असून भाविकांनी तसेच जिल्हयातील व जिल्हयाबाहेरील येणाऱ्या पैलवानांनी याची दखल घ्यावी व यात्रेसाठी कोणीही येऊन गर्दी करु नये असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.फक्त धार्मिक कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात येणार असून काही आक्षेपार्ह बाब घडल्यास त्यास यात्रा कमिटी जबाबदार राहणार नाही असे सांगण्यात आले आहे. 

भाळवणी येथे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण संपन्न...

 श्रीक्षेत्र नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात येथील महिला मंडळाच्या वतीने शिवलीलामृत या ग्रंथाचे तीन दिवसांचे पारायण शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत संपन्न झाले असून या पारायणासाठी व्यासपीठचालक म्हणून संजय जाधव महाराज यांनी काम पाहत.या पारायणा साठी गावातील महिला ह.भ.प. हिराबाई रोहोकले, सविता बांगर, सविता रोहोकले, मीराबाई भागवत, बेबी रोहोकले, अलका जराड, संगीता जाधव, उषा पठारे, आशा चौरे, शारदा भनगडे, सौ. तळेकर, खेनट, गौरी रोहोकले, ऋतुजा रोहोकले, दगडूभाऊ कपाळे आदींनी सहभाग घेतला होता. यावेळी बाबा महाराज दळवी हेही उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या