Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊन?, सामना अग्रलेखातून गंभीर इशारा

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून पुन्हा एकदा लॉक डाऊनचा इशारा देण्यात आला आहे. लोकांनी स्वयंशिस्त पाळायलाच हवी असं सांगत सद्यपरिस्थितीत पुन्हा लॉकडाऊन? टाळता आला तर बघा’, असा अग्रलेखात म्हटलंय.

दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती

मुंबईत कोरोना वाढला त्याचे खापर लोकल ट्रेन्सवर फोडले जात आहे. तसे असेल तर दिल्लीतही मेट्रोसुरू आहेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी. स्वतःवरच काही निर्बंध घालून जगायला हवे. पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, गृहमंत्री शहा रोड शोकरतात म्हणून ते स्वातंत्र्य सामान्य नागरिकांना नाही. लोकांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायलाच हवी.

दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे कोरोनात्यांना स्पर्श करीत नसेल, पण सामान्य जनांचे तसे नाही. काळजी घ्या नाहीतर लॉक डाऊन व कडक निर्बंध अटळ आहेत असे वातावरण तयार झाले आहे, असा इशारा सामना अग्रलेखातून देण्यात आला आहे.

महाराष्ट्र पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने जात आहे काय?

महाराष्ट्र पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने जात आहे काय? असे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनावर लस आली आहे. लोक रांगा लावून लस घेत आहेत. लस आल्यामुळे लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असतानाच महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यात महाराष्ट्राचा आकडा जास्त आहे ही बाब चिंता करण्यासारखीच आहे

बंगालच्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय?

महाराष्ट्रात रोज सरासरी 10 हजार नवे रुग्ण कोरोनाच्या विळख्यात येत आहेत व 70-75 जणांचे बळी जात आहेत. प्रशासनाने अनेक भागांत अंशतः लॉक डाऊन सुरू केले. ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागांत कोरोनाचे हॉट स्पॉटनिर्माण झाले. विदर्भ-मराठवाडय़ातील अनेक भागांत चिंता वाटावी अशा पद्धतीने कोरोना उसळत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसारख्या शहरांत लोकांनी गर्दी केली. बाजार, मॉल्स, लग्न समारंभात निर्बंध पाळले नाहीत. मंदिरे उघडायला लावली. लोकल ट्रेन्स सुरू करण्याचा आग्रह धरल्यामुळे कोरोना वाढला, असे जे बोलले जात आहे ते खरे मानले तर प. बंगालातील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय? असा सवाल करण्यात आला आह.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या