Ticker

6/Breaking/ticker-posts

श्रीक्षेत्र धरमपुरीत श्रीसंत गजानन महाराजांचा प्रकटदिन साजरा

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर:-  प्रति शेगांव समजल्या जाणार्या नगर तालुक्यातील इसळकनिंबळक येथील श्री क्षेत्र धरमपुरीत श्रीसंत गजानन महाराजांचा प्रकटदिन साध्या पद्धतीने पण शासकीय नियम पाळून भाविकांनी उत्साहात साजरा केला.पहाटे श्रींच्या मूर्तीस रुद्राभिषेक करण्यात आलामोजक्याच भाविकांनी तीन दिवस केलेल्या पारायण सोहळ्याची सांगता झालीप्रथा म्हणून 10 ते 15 भाविकांनी पालखी प्रदक्षिणा घालून मंदिर परिसरातून छोटी  मिरवणूक काढली.

याप्रसंगी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ.महेश मुळे यांनी भाविकांना कोरोनाला घाबरु नका पण शासनाने दिलेले नियम आवश्य पाळालस आली तरी कोरोनाचे गांभिर्य लक्षात ठेवामास्कसॅनिटायझरस्वच्छता पाळा  प्रतिकार शक्ती वाढेल असा आहार घ्याअसे आपल्या व्याख्यानातून सांगितले.

भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आलीगर्दी टाळण्यासाठी यावर्षी महाप्रसादाची जेवणावळी  ठेवता फक्त बुंदीचा प्रसाद वाटप करण्यात आलाकार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीक्षेत्र धरमपुरी भक्तवृंदांनी विशेष परिश्रम घेतलेभाविकांनी स्वत:हून सहकार्य केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या