Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डी पालिका कार्यालयात बोंबाबोंब..!

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

पाथर्डी :-शहरातील असणाऱ्या नागरी समस्या बाबत नगरपरिषदेच्या कार्यालयात बोंबाबोंब आंदोलन करून  मुख्यधिकारी धनंजय कोळेकर यांना निवेदन दिले.माजी नगराध्यक्ष अँड दिनकरराव पालवे, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

 नगरपरिषद हद्दीमध्ये जवळपास सात ते आठ दिवस उलटून गेले पाणी पुरवठा बंद आहे तो तात्काळ सुरू करावा.गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी घरकुल योजनेचे प्रलंबित अनुदान रक्कम त्वरित द्यावी. शहरामध्ये अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्याची लवकरात लवकर  विल्हेवाट लाऊन कायम स्वच्छता ठेवावी.स्व लोकनेते गोपीनाथ मुंडे जॉगिंग पार्क चे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून बंद पडलेले असून अर्धवट आहे.तर खुले नाट्यगृह या जागेवर चालू असलेल्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. या दोन्ही कामाची उच्चस्तरीय चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करावी.शहरात अनेक ठिकाणी घाण पाण्याचे डबके साचलेले आहेत तर उपनगरात  बऱ्याच ठिकाणी झाडेझुडपे मोठ्या स्वरूपात वाढली आहे त्याची स्वच्छता झाली पाहिजे. 

 शहरांमध्ये जाणाऱ्या 222 राष्ट्रीय महामार्ग या हायवेवरच्या  ईलेक्ट्रिकल पोलच्या अवतीभोवती वेड्या बाभळी आहेत.रस्त्याच्या मध्ये मातीचे ढीग साचलेले असून ते हटवण्यात यावे.नागरिकांसाठी सार्वजनिक मुताऱ्या व शौचालय उभारावे .सध्या शहराला बंद असलेला पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्यात यावा आदी समस्ये बाबत गांभीर्याने विचारकरून  कारवाई करून दखल घेतली गेली नाही व पाणी पुरवठा  तात्काळ चालू केला नाही तर येत्या दोन दिवसांमध्ये पालिकेवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 

 अँड दिनकराव पालवे ,किसन आव्हाड,सुनील पाखरे,मनसेचे संतोष जिरेसाळ,अविनाश पालवे ,अशोक ढाकणे,किशोर सानप,नागनाथ गर्जे ,नवाब शेख ,शब्बीर शेख आदी कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी धंनजय कोळेकर यांच्या बरोबर चर्चा करून पाणी पुरवठा सुरळीत करून शहरातील नागरी समस्यां सोडाव्यात अशी आग्रही मागणी करण्यात आली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या