Ticker

6/Breaking/ticker-posts

तामिळनाडूत लॉकडाऊनमध्ये ३१ मार्चपर्यंत वाढ..

 


लोकनेता न्यूज 

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

चेन्नई : तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच राज्यात लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये येत्या ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.तामिळनाडूच्या सर्व अर्थात २३४ विधानसभा मतदार संघांत ६ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकांच्या वातावरणातच राज्य सरकारनं लॉकडाऊन निर्बंध कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.


लॉकडाऊन अंतर्गत सरकारी खासगी कार्यालय, दुकानं आणि औद्योगिक संस्थांमध्ये वेगवेगळ्या वेळेत काही ठराविक कर्मचाऱ्यांची उपस्थिती असेल. कोविड नियमांच्या उल्लंघनावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कन्टेन्मेंट झोनसंबंधी सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु, आवश्यक सेवांना यातून सूट देण्यातआलीय.तामिळनाडूत आत्तापर्यंत ८,५१,५४२ करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. यापैंकी ४०२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल ८,३५,०२४ रुग्णांनी करोनावर मात केलीय. राज्यात आत्तापर्यंत १२,४९६ जणांनी प्राण गमावले आहेत. राज्यात एव्हाना १.७ कोटींहून अधिक करोना चाचण्या पार पडल्या आहेत. दरम्यान, देशात करोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आलीय. या टप्प्यात ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती तसंच ४५ हून अधिक वयाच्या परंतु गंभीर आजारांना तोंड देणाऱ्या व्यक्तींना करोना लस दिली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या