Ticker

6/Breaking/ticker-posts

अग्नीसमोर घ्यावी लागणार ७ नाही तर आता ८ फेरे ! वाचा..

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

 मुंबई : लग्न हे अतूट बंधन आहे. हिंदू धर्मातील लग्न हे सात वचनं दिल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. त्यामुळे लग्नातील सात फेऱ्यांना फार अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. पवित्र अग्नीसमोर सात फेरे घेत हा लग्नसोहळा पार पडतो. भारतीय लग्नात सात फेरे किंवा सात वचन दिले जातात. पण तुम्ही 8 व्या वचनाबद्दल ऐकलं किंवा वाचलात का? नाही ना. पण सध्या सोशल मीडियावर लग्नातील आठव्या वचनाबद्दलची चर्चा रंगली आहे.

 

सध्या सोशल मीडियावर या आठव्या वचनाला पसंती दिली जात आहे. हा आठवा फेरा प्रत्येक जोडपं त्याच्या त्यांच्या सोयीप्रमाणे घेते. कधीकधी काही नवविवाहित जोडपी एखाद्या सामाजिक मुद्द्यावर आठवा फेरा किंवा आठवं वचन घेतात. त्यामुळे त्या सामाजिक मुद्द्याला समर्थन दिले जाते. मात्र सध्या एका अनोख्या आठव्या वचनाची चर्चा होत आहे. त्यामुळे अनेकांना त्यांचे हसू आवरता येत नाही.

सध्या सोशल मीडियावर एक अनोखे आठवे वचन ट्रेंड होत आहे. हे आठवे वचन IPS अधिकारी दिपांशू काबरा यांनी ट्वीटरवर शेअर केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी ट्वीट केलेला हा जोक इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या