Ticker

6/Breaking/ticker-posts

8 महिन्यांत सोने-चांदी 13,000 रुपयांनी स्वस्त..!

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली: संपूर्ण जगात आणि विशेषत: भारतामध्ये सोन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कठीण काळात संसाराचा गाडा हाकण्यासाठी सोने बऱ्याचदा फायदेशीर ठरते. कोरोना संकटाच्या काळातही सोन्यानं अनेक कुटुंबांना आधार दिला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरला आणि अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली. 2020 दरम्यान  सोन्याने गुंतवणुकदाराना मोठा नफा कमावून दिला. ऑगस्ट 2020 रोजी प्रति 10 ग्रॅम 57,008 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते, पण आता सोने  जवळपास सर्वोच्च स्तरापासून आठ महिन्यांत 13 हजार रुपयांनी स्वस्त झालंय

 

सोने आठ महिन्यांत 13 हजार रुपयांनी स्वस्त

शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी सोन्याची किंमत 7 ऑगस्ट 2020 पासूनच्या सर्वोच्च पातळीवरून 13,121 रुपयांनी घसरली असून, आता सोने प्रतितोळा 43,887 रुपयांवर आलेय.  7  ऑगस्ट 2020 ला चांदी 77,840 रुपये प्रतिकिलो होती, जी गेल्या शुक्रवारी 13,035 रुपयांनी घसरून  64,805 रुपये झाली. दरम्यान, दररोज सोन्याच्या भावात घसरण होत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करावी की दुसऱ्या कशात याचा विचारात गुंतवणूकदार आहेत. त्याच वेळी काही गुंतवणूकदार आपल्याकडे असलेले सोने विक्री करण्याचे किंवा ठेवण्याबद्दल संभ्रमित आहेत. येत्या काळात सोन्याचा ट्रेंड काय असू शकतो?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या