Ticker

6/Breaking/ticker-posts

प्रेमासाठी वाट्टेल ते .."तिच्यासाठी" त्याने लिहिले 7 किलोमीटर 'आय लव्ह यू' !

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

कोल्हापूर : प्रेम हे प्रेम असतं तुमच आमचं सेम असतं असं प्रसिद्ध चारोळीकार चंद्रशेखर गोखले यांनी म्हटले आहे. पण याला छेद देत प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत कोल्हापूर जिल्ह्यातील एका प्रेमवीराने आपल्या प्रेयसी साठी अनोखाच पराक्रम केला आहे.आय लव्ह यू, आय मिस यू,जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी अशी अक्षरे डांबरी रस्त्यावर ऑइलपेंटने लिहिले आहेत. आणि हो ती थोडीथोडकी नव्हे तर तब्बल सात किलोमीटरच्या रस्त्यावर ! आता ही अक्षरे पुसता पुसता प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत.

प्रेमासाठी वाट्टेल ते ..

प्रेमात कोणीही काहीही करू शकते आणि कोणत्याही स्तराला जाऊ शकतो याची आपण अनेक उदाहरणे समोर आहेत. कडक लॉकडाऊनच्या काळात उस्मानाबादमधला प्रियकर आपल्या प्रेयसीला भेटायला चक्क पाकिस्तानला चालला होता हे उदाहरण सुद्धा समोर आहे.. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातही अशाच एका प्रियकराने धरणगुत्ती ते जयसिंगपूर मार्गावर तब्बल अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर ‘आय लव यु’ आणि ‘आय मिस यु’ असे ऑईल पेंटने लिहिले आहे. रात्रीच्या वेळी हे लिहिण्यात आले असावे. याचे फोटो आता जिल्ह्यात व्हायरल होत असून या प्रेमवीराची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. मात्र हा प्रेमवीर नेमका कोण आहे आणि त्याने कोणासाठी लिहिले हे मात्र, समजू शकले नाही. मात्र हा जो कोण प्रियकर आहे त्याने हा रस्ता कधी रंगवला याचा कुणाला थांगपत्ता लागलेला नाही

जयसिंगपूर ते धरणगुत्ती हा 6 ते 7 किलोमीटरचा रस्ता आहे. गावाच्या तीन किलोमीटर अलिकडे ‘आय लव्ह यु’ आणि ‘आय मिस यु’ लिखाणाची सुरूवात झाली आहे. तर गाव संपण्याच्या अर्धा किलोमीटर आधी हे लिखाण थांबलं आहे. दरम्यान, प्रेमात बुडालेला प्रियकर कोण आहे याची उत्सुकता पंचक्रोशीसह तालुक्यातील नागरिकांना लागली आहे.

प्रशासनावर आली ऑईलपेंट पुसण्याची वेळ 

शिरोळ तालुक्यात धरणगुत्ती गावाच्या परिसरात प्रियकराने 'आय मिस यु' आणि आय लव्ह यु असे लिहिले होते. तब्बल अडीच किलोमीटरवर हे लिहिण्यात आले होते. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. याचा धरणगुत्ती ग्रामपंचायत प्रशासनाला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. येथील प्रशासनाकडून प्रेमवीराने लिहिलेले संदेश पांढऱ्या ऑइल पेंटद्वारे पुसून टाकण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या