Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये 10 एप्रिल रोजी राष्ट्रीय लोकअदालत

 



लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

अहमदनगर: - जिल्हयामध्ये शनिवार दि. 10  एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार व नागरीकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामंजस्याने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सहकार्य करावेअसे आवाहन जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. श्रीकांत आणेकर यांनी केले आहे.

    राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणनवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबई यांच्या सुचनेनुसार आयोजित या राष्ट्रीय लोकदालती मध्ये दाखलपुर्व व प्रलंबीत प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. नगर जिल्हा मुख्य न्यायालयासह जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय न्यायालयांमध्ये घेण्यात येत असलेल्या या लोक अदालतीमध्ये न्यायालयातील दिवाणीफौजदारीएन.आय अॅक्ट ची प्रकरणेबँकेची कर्ज वसुली प्रकरणेमोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणेकामगार कायद्याखालील प्रकरणेकौटुंबीक वादांची प्रकरणेइलेक्ट्रीसीटी अॅक्टची समजोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपुर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. पक्षकारांनी आपसी समझोत्याकरिता ठेवून ती सामंजस्याने सोडवण्याबाबतचे अवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा न्या. श्रीकांत आणेकर तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. रेवती देशपांडे यांनी केले आहे.

      अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरीकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा नगर न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालय येथे स्वतः येऊन कळवावे. असे आवाहन आयोजकांनी केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या