Ticker

6/Breaking/ticker-posts

वनमंत्री संजय राठोड यांचा अखेर राजीनामा ..!

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: पुजा चव्हाण प्रकरणात मोठा गदारोळ झाला असून त्या पार्श्वभूमीवर प्रचंड तनावात असलेल्या वनमंत्री राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मातोश्रीवर आताच पाठविला असल्याचे वृत हाती आले आहे .



दरम्यान याप्रकरणी शिवसेनेत बराच खल होऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राठोड यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचे समजते . शिवसेनेत दोन गटातील बेबनाव आणि परस्पर विरोधी मतांमुळे जोरदार वादंग झाले. त्यामुळे या वादाची परिणिती राठोड यांच्या राजीनाम्यात झाली आहे .


पुजा चव्हाण प्रकरणी भाजपाचे नेते अत्यंत आक्रमक झाले होते . या विषयावरून विरोधक राजकारण करत असतांना स्वपक्षातही राजकारण पेटले . सेनेत सरळ - सरळ दोन गट पडले . हा विषय जेवढा नाजूक होता तेवढाच संवेदनशील बनला होता . आता तर अत्यंत गंभीर वळण घेण्याच्या स्थितीत पोहचला त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांना वेळीच राठोड यांचा राजीनामा घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही .  आता विरोधकांनी केवळ राजीनाम्यावर हे प्रकरण थांबवू नका तर थेट कारवाई करण्याची मागणी केली आहे . 


राठोड यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या  उपस्थिती त ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे . बैठकीत प्रकरणी विचार मंथन होऊन काय निर्णय होतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे . सेनेसह मुंबईतील राजकीय गोगत अजून काय घडमोडी घडतात हे यथावकाश स्पष्ट होईल ..



पार्श्वभूमी

  संजय राठोड प्रकरना वरुन शिवसेनेतील नेत्यांमध्येच दोन गट पडले आहेत. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सगळ्याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



 पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात विरोधकांच्या टीकेचा जोर वाढल्यानंतर आता राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे. येत्या गुरुवारी पोहरादेवी येथे ते आपल्या राजीनाम्याची घोषणा करतील, असे सांगितले जात आहे.

पूजा चव्हाण प्रकरणाची सखोल आणि व्यवस्थित चौकशी होऊन सत्य लोकांसमोर येईल. त्यानंतर गरज पडल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांची ही भूमिका म्हणजे निव्वळ वेळकाढूपणा असल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी हे प्रकरण सातत्याने लावून धरले आहे. त्यामुळे शिवसेनेवर संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचा दबाव वाढत आहे.

राठोड यांचा राजीनामा का घ्यावा?

नैतिकतेचा भाग म्हणून संजय राठोड यांनी राजीनामा देण्याची गरज आहे. या मताचा शिवसेनेतील एक गट आहे. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर आल्यापासून संजय राठोड एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते नॉट रिचेबल आहेत. या सगळ्याचा फटका शिवसेनेच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला संजय राठोड यांनी राजीनामा देणे योग्य ठरेल, असे शिवसेनेतील काही नेत्यांचे म्हणणे आहे.

का देऊ नये संजय राठोड यांनी राजीनामा?

गेल्या काही दिवसांत पूजा चव्हाण प्रकरणात पूजाने कर्जाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावरही अशाप्रकारचे आरोप झाले होते. मात्र, तेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. मग संजय राठोड यांच्याबाबतीतच नैतिकतेचा आग्रह का धरायचा, असे शिवसेनेतील दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे. . बंजारा समाजाचे नेते आणि धर्मगुरुंनीही संजय राठोड यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे तुर्तास संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असे शिवसेनेतील दुसऱ्या गटाचे मत आहे.

राठोड प्रसारमाध्यमांशी बोलण्याची शक्यता

वाशिम जिल्ह्यात पोहरा देवी हे गाव आहे. या ठिकाणी बंजारा समाजाचे दैवत संत सेवालाल महाराजांचे मोठे मंदिर आहे. बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि महंत याच मंदिरात असतात. गुरुवारी या मंदिरात येऊनच धर्मगुरूंच्या साक्षीने राठोड आपली बाजू मांडणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या