Ticker

6/Breaking/ticker-posts

पूजा चव्हाण आत्महत्या: अखेर.. पोलिस महासंचालकांचे चौकशीचे आदेश

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) .

पुणे: परळीतील युवती आणि सोशल मीडिया स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालक  हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना  सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल या प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल असे म्हटले होते. त्यानंतर पोलिस महासंचालकांनी हे आदेश दिले आहेत.

 पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सतत आरोप होत असून विरोधी पक्षांकडून टीकेचे रान उठवले जात आहे. दरम्यान, याप्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने देखील पुणे पोलिसांकडून या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल मागवला आहे. या प्रकरणाचा तपास वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक लगड हे परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. याप्रकरणात अजूनही पूजा चव्हाण हिच्या कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पूजा चव्हाणे कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याबाबत काहीही स्पष्टता नाही. पूजा चव्हाण ही इंग्रजी संभाषण कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पुणे शहरात आली होती. पूजा, तिचा चुलत भाऊ आणि एका मित्रासोबत हेवन पार्क परिसरातील एका घरात राहत होते. रविवारी, ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पूजाने बाल्कनीतून उडी मारली. याप्रकरणात पोलिसांनी तिच्या सोबत असलेला तिचा चुलतभाऊ आणि मित्राचा जबाब नोंदवून घेतला आहे.

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमागे एक मंत्री असल्याचे एका मोबाइलवरील संभाषणावरून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भारतीय जनता पक्षाने टीकेचे रान उठवत चौकशीची मागणी केली आहे. या तरुणीचा लॅपटॉप स्कॅन केल्यास आणखी पुरावे बाहेर येतील. त्यामुळे मुख्यमंत्री आणि सरकारचे कर्तेधर्ते असलेले शरद पवार यांनी संबंधित मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वारंवार केली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या