Ticker

6/Breaking/ticker-posts

भर बाजारात दहशतवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबार

 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 


श्रीनगर :
 जम्मू - काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा पोलिसांवर अचानक गोळीबार केलाय. बाराजुल्ला भागात दहशतवाद्यांनी शुक्रवारी दुपारी पोलीस टीमवर गोळ्यांचा वर्षाव केला. या फायरिंगमध्ये दोन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दोन्हीही शहीद जवान जम्मू - काश्मीरमध्ये पोलीस दलात तैनात होते. या घटनेनंतर भागाला घेराव घालण्यात आलाय तसंच सर्च ऑपरेशन सुरू आहे.

एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय. ज्यामध्ये एक दहशतवादी एके ४७ नं गोळीबार करताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, भर मार्केटमध्ये हा दहशतवादी हातात बंदूक घेऊन उभा आहे.सीसीटीव्हीमध्ये एकच दहशतवादी दिसत असला तरी प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हा घातपात दोन दहशतवाद्यांनी घडवून आणला. गोळीबारानंतर दहशतवादी लगेचच घटनास्थळावरून पसार झाले. जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सेनेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

श्रीनगर विमानतळाला श्रीनगर शहराशी जोडणाऱ्या रस्त्याच्या सुरक्षेत तैनात असताना दहशतवाद्यांनी पोलिसांवर हा हल्ला केला. शेजारीच बाराजुल्लाचं पोलीस स्टेशनही आहे. दहशतवादी एका अरुंद गल्लीतून आले. पोलिसांवर गोळीबार केला आणि पसार झाले, असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलंय. यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या जागांवर शोपिया आणि बलगाममध्ये झालेल्या एन्काऊन्टरमध्ये लष्करचे तीन दहशतवादी ठार करण्यात आले होते. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराकडून दोन वेगवेगळ्या ठिकाणी हे एन्काऊन्टर केले. या ऑपरेशनमध्ये एसपीओ अल्ताफ अहमद हे शहीद झाले तर एक जवानही जखमी झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या