Ticker

6/Breaking/ticker-posts

अंगभर दागिने घालता, फिरतानाचे फोटो टाकता, मग चोरांना काय घर मोकळंच, अजितदादांची फटकेबाजी


 

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

पुणे : शहर पोलीस आयुक्तालयातर्फे किमती आणि मौल्यवान मुद्देमाल फिर्यादीस पुन:प्रदान कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी अजितदादांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना मोलाचे सल्लेही दिले. त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनाही अजितदादांनी महत्वाच्या सूचना केल्या आहेत. फिरायला गेल्यावर तिथले फोटो सोशल मीडियावर टाकतात. मग चोरांना घर मोकळंच मिळतं. घरी येऊन फोटो कुठे टाकायचे तिकडे टाका. पोलीस कुठे कुठे बघणार असा, असा सल्ला अजित पवार यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलाय.

अंगभर दागिना घालताना काळजी घेण्याची गरज आहे. कारण काहीजण बारकाईनं लक्ष ठेवून डल्ला मारतात, अशी सूचनाही अजितवारांनी नागरिकांना केली आहे. दरम्यान आपल्या हद्दीत गुन्हाच घडणार नाही यासाठी पोलिसांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पोलिसच चोरांना घाबरुन पळून गेले, हे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं होतं. त्यामुळे संपूर्ण पोलिस दलाची प्रतिमा खराब होते, मनोबल खचतं, अशा शब्दात अजितदादांनी पोलिसांना आपलं कर्तव्य बजावण्याचं आवाहन केलं आहे. पोलीस दलाकडून जनतेला खूप अपेक्षा आहेत. सामान्य माणसाला पोलीस स्टेशनला जावंच लागणार नाही याची काळजी घ्यावी. लॉकडाऊनमध्ये ऑनलाईन गुन्हेगारी वाढली आहे. यासंदर्भात पोलिसांना योग्य ती ट्रेनिंग देण्याची गरज असल्याचंही अजित पवार यांनी म्हटलंय. आपली पोलीस यंत्रणा कशी सक्षम होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सध्या पोलिसांच्या घरांचा मोठा प्रश्न आहे. तो सोडवण्यासाठी आम्ही पोलिसांच्या घराचे काम मोठ्या प्रमामात हाती घेतल्याचंही अजितदादांनी सांगितलं.

गजा मारणे प्रकरणात पोलिसांना सूचना

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर गुंड गजा मारणेची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. तसंच मारणेच्या स्वागतासाठी 300 हून अधिक गाड्यांनी एक्सप्रेस वेवर धिंगाणा घातला. त्यावरुन अजित पवार यांनी पोलिसांची कानउघाडणी केली आहे. पुण्यात एका गुंडाची मिरवणूक निघते, हे शहराच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. पोलिसांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. गुन्हेगारीचं उदात्तीकरण होता कामा नये, याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही अजित पवारांनी पोलिसांना केलीय.

पोलीस अधिकाऱ्यांची कानउघाडणी

पोलिसांनी सल्ला देतानाच अजित पवार यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणीही केली.लाखो रुपये किमतिच्या गाडया पोलीस अधिकारी वापरतात, त्या सुधधा कोनीतरी दिल्या होत्या, आपण सरकारी अधिकारी आहोत याचं भान राखलं पाहिजे. लोकांचं आपल्यावर बारीक लक्ष असतं, खासगी आयुष्य कसं जगता ही प्रत्येकाची खासगी बाब असली तरी आपण सरकारी अधिकारी आहोत, याचं भान ठेवलं पाहिजे, अशा शब्दात अजितदादांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या