Ticker

6/Breaking/ticker-posts

नासाने करून दाखवलं ! मंगळावर यान दाखल, पहिले छायाचित्र जारी

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क ) 

वॉशिंग्टन: अमेरिकेची अंतराळ संस्था 'नासा'च्या  रोव्हरने भारतीय वेळेनुसार आज शुक्रवारी मंगळावर यशस्वीपणे लँडिंग केले. जवळपास सात महिन्यांपूर्वी या रोव्हरने पृथ्वीवर उड्डाण केले होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री दोन वाजून २५ मिनिटांच्या सुमारास Perseverance रोव्हरने मंगळावर लँडिंग केले. रोव्हर मंगळावर उतरल्यानंतर नासाने पहिले छायाचित्र जारी केले. अंतराळ संशोधनाच्यादृष्टीने ही मोहीम महत्त्वाची समजली जाते.

नासाने आपल्या ट्विटर हॅण्डलवर मंगळ ग्रहावर दाखल झालेल्या रोव्हरचा फोटो जारी केला. यामध्ये Perseverance च्यावतीने 'माझ्या घरातील माझा पहिला लूक' अशी फोटोओळही दिली आहे. नासाने रोव्हरच्या दुसऱ्या बाजूनेही एक फोटो शेअर केला आहे. मंगळावर जेजेरो क्रेटरवर उतरलेल्या रोव्हरच्या मदतीने मंगळ ग्रहावरील अनेक रहस्यांवरील पडदा उठण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

लँडिंग करणे होते कठीण
या मोहिमेतील सात मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. या सात मिनिटांत क्राफ्ट १२ हजार मैल प्रतितास इतक्या वेगापासून कमी होऊन ते शून्य मैल प्रतितास या वेगाने मंगळाच्या पृष्ठाभागावर उतरणार होता. त्यामुळेच मंगळ मोहिमेच्या दृष्टीने ही सात मिनिटे महत्त्वाची ठरली. वेग कमी करण्यासाठी पॅराशूट आणि रेट्रोरॉकेट लावण्यात आले होते. वेग नियंत्रित करून मंगळाच्या पृ्ष्ठभागावर उतरल्यानंतर खड्डे आणि इतर अडथळ्यांपासून बचाव करण्याचे आव्हान होते. रोव्हरने या अडथळ्यांवर मात करून यशस्वीपणे लँडिंग केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या