Ticker

6/Breaking/ticker-posts

संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला? पोहरादेवीला शरण जाणार

 

लोकनेता न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क )  

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड आज  यांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला आहे. निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. अद्याप संजय राठोड यांनी याप्रकरणात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पूजा चव्हाणने 7 फेब्रुवारीला पुण्यात आत्महत्या केली. त्यानंतर संजय राठोड यांच्या आवाजातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या. यानंतर भाजपने थेट संजय राठोड यांचं नाव घेऊन, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलीच, त्याशिवाय त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी आज राजीनामा पाठवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. संजय राठोड हे 7 फेब्रुवारीपासून नॉट रिचेबल आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांची गाडी मंत्रालयाच्या पार्किंगमध्ये उभी आहे. संजय राठोड यांचा कोणाशीच संपर्क नाही. माध्यमांनीही त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्कच होत नाही.


पोहरादेवीला शरण जाण्याची शक्यता

दरम्यान, नॉट रिचेबल असलेले संजय राठोड हे वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजेचे आराध्य दैवत असलेल्या पोहरादेवीला शरण जाण्याची शक्यता आहेत. कारण पोहरादेवी हे बंजारा समाजाची काशी समजली जाते. इथे येऊन संजय राठोड आपली भूमिका मांडण्याची चिन्हं आहेत. नुकतीच सेवालाल जयंती झाली. यावेळी बंजारा समाजाने संजय राठोड यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.


पोहरादेवीचं महत्व काय

वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या संत सेवालाल महाराज, आई जगदंबामाता आणि राष्ट्रीय संत डॉ. रामराव महाराज यांच्या दर्शनासाठी देश विदेशातून भाविक येथे हजेरी लावलात.पोहरादेवी येथे बंजारा समाजचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची समाधी आहे. नुकतंच ऑक्टोबर महिन्यात संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरु रामराव महारांजांचं निधन झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते दिग्गजांनी रामराव महारांजांना श्रद्धांजली अर्पण केली होती.

 बंजारा समाज पाठिशी

दरम्यान, संजय राठोड यांच्या पाठिशी बंजार समाज उभा असल्याचं त्यांचे प्रतिनिधी सांगतात. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी संस्थानच्या महंतांची काल बैठक पार पडली. यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच विरोधकांनी समाजाची बदनामी केल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या