Ticker

6/Breaking/ticker-posts

जलसमाधी दिवस ! जहाज व बस कालव्यात कोसळले, ७५४ बुडले ; ९८ मृत ४१६ बेपत्ता

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क) 

नवी दिल्ली: डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशात जहाज कालव्यात उलथुन ७०० प्रवाशी वाहुन गेल्याची   घटना सोम्वारी कांगो नदीत घडली, या घटनेत जहाजातून प्रवास करणाऱ्या 700 प्रवाशांपैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतर प्रवासी बेपत्ता आहेत. जहाजतून क्षमेतेपेक्षा जास्त व्यक्ती प्रवास करत असल्यानं दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे.

मध्यप्रदेशात सीधी जिल्ह्यात सीधी सतनाकडे निघालेली एक बस कोलव्यात कोसळून ५४ प्रवासी वाहुन गेल्याची   घटना घडली. या बसमधून जवळपास ५४ प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर जवळपास सात प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आत्तापर्यंत ३८ मृतदेह हाती लागले आहेत तर इतरांचा शोध सुरू आहे. हा कालवा इतका खोल आहे की संपूर्ण बस कालव्याच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिस आहे. या   दोन  दुर्घटनामुळ कालचा वार जलसमाधी दिवस राहीला.

जहाजावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी

कांगो देशाचे मंत्री स्टीव मबिकायी यांनी जहाजातून 700 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती दिली. त्यापैकी 300 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. ही घटना माई-नोमडबे प्रांतातमध्ये घडली. ते जहाज रविवारी रात्री किनहासा प्रांतातून मबनडाका येथे जाण्यासाठी रवाना झाली होती. माई-नोमडबे प्रांतातील लोंगगोला इकोती गावाजवळ जहाज पोहोचल्यानंतर दुर्घटना घडली. मंत्री स्टीव मबिकायी यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास करणे हे आहे. याशिवाय जहाजामध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनाचं साहित्य देखील भरलं गेलं होतं. मबिकायी यांनी या घटनेत जीव गमावलेल्यांना आदरांजली व्यक्त केली आहे. तर, या घटनेत जीव गमावलेल्या परिवाराच्या सदस्यांप्रती सहवेदना व्यक्क केल्या आहेत. त्यासह या घटनेला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

300 लोकांना वाचवण्यात यश 60 जणांचा मृत्यू

जहाजातून एकूण 700 प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी 300 लोकांना वाचवण्यात यश आलं असून 60 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इतर प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध लागणं बाकी आहे. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी कांगो नदीतून प्रवासाला प्राधान्य

कांगो नदीचा वापर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी केला जातो. कांगो नदीत जहाज दुर्घटना सातत्यानं होतं असतात. कांगो देशातील रस्त्यांची स्थिती खराब असल्यान लोक कांगो नदीतून प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे जहाजातून प्रवास करताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी एका जहाजामध्ये बसलेले आढळतात. कांगोमधील रहिवाशांसाठी कांगो नदीतून प्रवास करणं सोपा पर्याय आहे. मात्र, जहाजातून अधिक लोक प्रवास करत असल्यानं दुर्घटना घडतात. कांगोमधील अर्थव्यवस्था खराब असल्यामुळे पायाभूत सोयी सुविधांचा विकास झालेला नाही.

 

भोपाळ : मध्यप्रदेशात सीधी जिल्ह्यात एक भीषण अपघात झाल्याचं समोर येतंय. सीधी सतनाकडे निघालेली एक बस कोलव्यात कोसळून हा अपघात झाला. या बसमधून जवळपास ५४ प्रवासी प्रवास करत होते. दुर्घटनेनंतर जवळपास सात प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आत्तापर्यंत ३८ मृतदेह हाती लागले आहेत तर इतरांचा शोध सुरू आहे. हा कालवा इतका खोल आहे की संपूर्ण बस कालव्याच्या पाण्यात बुडालेल्या अवस्थेत दिस आहे. क्रेनच्या मदतीनं ही बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुर्घटनेनंतर जवळपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. इथे मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित आहेत. बस दुर्घटनेसंबंधी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत राज्य सरकारनं जाहीर केलीय.

 

कालवा खुप खोल आहे आम्ही तातडीनं धरणाचं पाणी थांबवण्याचे आदेश दिले तसंच मदत आणि बचाव पथकांना रवाना करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी, एसपी आणि एसडीआरएफ पथकं मदतीसाठी हजर आहेत. बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मी मदत आणि बचाव कार्यात सहभागी टीमच्या संपर्कात आहे. सात जणांचा जीव वाचवण्यात यश आलंय, अशी माहिती मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलीय. हा अपघात रीवा-सीधी सीमेजवळ छुहियाघाटानजिक घडला. बाणसागर प्रकल्पाच्या कालव्यात ही बस कोसळलीय. दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी एसडीआरएफची मदत घेण्यात येतेय.

 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या