लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क
मुंबई
: सरसंघचालक मोहन भागवत
आज सकाळी मिथुन चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथुन चक्रवर्तींना भाजप विधानसभेच्या
रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिथुन यांची भेट घेऊन मोहन भागवत यांच्या
माध्यमातून भाजप चक्रवर्तींना आपल्याकडे खेचण्याची शक्यता व र्त वि न्या त येत आहे.
सरसंघचालक मोहन भागवत व मिथुन
चक्रवर्ती यांच्यात दीड तासापेक्षा जास्त काळ चर्चा झाली. ही भेट कौटुंबिक स्वरुपाची असल्याची
माहिती चक्रवर्तींनी दिली. मात्र आगामी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
या भेटीला राजकीय महत्त्व आहे. भागवत हे आज सकाळी अंदाजे सव्वानऊ वाजता मिथुन
चक्रवर्ती यांच्या मुंबईतील निवासस्थानी पोहोचले. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर भागवत आणि मिथुन चक्रवर्ती यांची बैठक महत्त्वाची मानली जाते.
“राजकीय नव्हे, कौटुंबिक भेट”
दरम्यान, खूप दिवसापासून आम्हाला भेटायचं होतं. पण आमच्या
व्यस्त कार्यक्रमांमुळे वेळ मिळत नव्हता.,मोहन भागवत यांनी
आज घरी येऊन नाश्ता केला. नागपूरला त्यांनी मला सहकुटुंब बोलवलं आहे, ही कौटुंबिक भेट असल्याचं मिथुन चक्रवर्ती यांनी सांगितलं. मिथुन
चक्रवर्ती आणि मोहन भागवत यांची ही पहिलीच भेट नाही. ऑक्टोबर 2019 मध्येही दोघांची भेट झाली होती. नागपुरातील संघ कार्यालयात त्यावेळी दोघे
भेटले होते.
पश्चिम बंगाल निवडणुका तोंडावर असल्याने राजकीय वातावरण तापण्यास
सुरुवात झाली आहे. मिथुन चक्रवर्ती हे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस
पक्षाचे राज्यसभा खासदार होते. मात्र वारंवार गैरहजेरीच्या कारणास्तव त्यांनी
खासदारकीचा राजीनामा दिला होता. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिथुन
चक्रवर्तींना भाजप विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिथुन
यांची भेट घेऊन मोहन भागवत यांच्या माध्यमातून भाजप चक्रवर्तींना आपल्याकडे
खेचण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0 टिप्पण्या